गटाराचा प्रश्न साेडवित नसल्याने ग्रामस्थाचे चक्क रेड्यासह ग्रामपंचायत कार्यालयात बस्तान..

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

सातारा : गेली दाेन वर्ष ग्रामपंचयात घरा जवळील गटाराचा प्रश्न साेडवित नसल्याने ग्रामस्थाने चक्क रेड्यासह ग्रामपंचायत कार्यालय गाठले. जाेपर्यंत प्रश्न सुटणार नाही ताेपर्यंत कार्यालयातच ठिय्या मांडणार असल्याचे ग्रामस्थाने भूमिका घेतली आहे.

हा प्रकार कराड (karad) तालुक्यात आज घडल्याने त्याची चर्चा सातारा (satara) जिल्ह्यात हाेत आहे.
कराड तालुक्यात वडगांव हवेली हे गाव आहे. या गावातील एक ग्रामस्थ गेली दाेन वर्ष त्याच्या घराजवळ असलेल्या गटाराच्या पाण्याचा त्यांच्या कुटुंबाला माेठा त्रास हाेत आहे. त्याबाबत अनेकदा तक्रारी करुन देखील त्याची दखल घेतली नाही असे ग्रामस्थाचे म्हणणे आहे.
हा प्रश्न सुटावा यासाठी आज त्रस्त ग्रामस्थाने ग्रामपंचायत कार्यालयात चक्क रेडा नेला. ग्रामस्थाने तिस-या मजल्यावरील ग्रामसेवकाच्या कार्यालयात रेड्यासह ठिय्या मांडला.
त्यानंतर संबंधित ग्रामस्थाची दादांनी फाेनवर समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु ग्रामस्थाने तुम्ही आल्याशिवाय मी येथून हलणार नाही अशी भुमिका घेतली. त्यामुळे उपस्थित कर्मचा-यांची भांबेरी उडाली.

✍️✍️हे ही वाचा

लोकशाही न्युज  वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

नवगण डोअर बीड  वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन

नवगण न्युज  वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या !