ताज्या बातम्यादेश-विदेश

सलूनमध्ये ‘व्हॅम्पायर फेशियल’ करणं महिलांना पडलं महागात; 3 महिलांना HIV ची लागण


सुंदर आणि तरुण दिसण्यासाठी प्रत्येकजण नवनवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो. आपला चेहरा सुंदर आणि चमकदार ठेवण्यासाठी अनेक लोक आपला जीव धोक्यात घालण्यास घाबरत नाहीत. सौंदर्य वाढवण्यासाठी विविध प्रकारचे उपचार घेतले जातात.



आजकाल सलूनमध्ये त्वचेची काळजी घेण्याचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत, जे सौंदर्य टिकवून ठेवण्याचा दावा करतात. तथापि, काही उपचारांमुळे काही धोके देखील वाढतात.

गेल्या काही दिवसांपासून अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. यापूर्वीही असेच एक प्रकरण समोर आले होते, ज्यात पार्लरमध्ये गेल्यावर एका महिलेची किडनी खराब झाली होती. आता अलीकडेच एक प्रकरण समोर आले आहे, ज्यात आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की अमेरिकेतील एका ब्युटी स्पामध्ये व्हॅम्पायर फेशियल (Vampire Facial) दरम्यान वापरल्या जाणाऱ्या सुयांमुळे तीन महिलांना एचआयव्हीचा संसर्ग (HIV Infection) झाला आहे.

अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी गलिच्छ कॉस्मेटिक इंजेक्शन्समधून रक्त-जनित विषाणूचा संसर्ग झाल्याची प्रकरणे नोंदवण्याची ही पहिलीच वेळ आहे. क्लिनिकच्या तपासणीत 40 ते 60 वयोगटातील तीन महिलांना स्पामध्ये चुकीच्या पद्धतींमुळे HIV विषाणूची लागण झाली.

सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन आणि न्यू मेक्सिको डिपार्टमेंट ऑफ हेल्थच्या तज्ज्ञांच्या मते, चारही महिलांना व्हॅम्पायर फेशियल देण्यात आले आणि त्यानंतर त्यांना लगेचच एचआयव्हीचा संसर्ग झाला.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button