ताज्या बातम्या

पंडित जमनराव भारुड हे छत्रपती शिवाजी महाराज जीवन गौरव पुरस्कार 2024 पुरस्काराने सन्मानित.


पंडित जमनराव भारुड हे छत्रपती शिवाजी महाराज जीवन गौरव पुरस्कार 2024 पुरस्काराने सन्मानित.



कोपरगाव प्रतिनिधी: कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील उद्योजक, तथा कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे सदस्य मा पंडित जमनराव भारुड यांना नुकताच सम्राट फाउंडेशन महाराष्ट्र राज्य व आदेश फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने श्री छत्रपती शिवाजी महाराज जीवन गौरव पुरस्कार 2024 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

 

कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील उद्योजक, तथा कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे सदस्य मा पंडित जमनराव भारुड यांना कायझेन अकॅडमीचे संचालक मा श्री महेश डाळिंबकर, हायकोर्टाचे विधिज्ञ मा श्री बी.ए हुसळे, तसेच डायरेक्टर ऑफ सेव्हलोन लिमिटेड मुंबईचे अध्यक्ष मा. श्री लक्ष्मण सहाने, सम्राट फाउंडेशन अध्यक्ष मा. राहुल सोनवणे आणि आदर्श फाउंडेशनचे अध्यक्ष मा सुनील मोकळ आदींच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज जीवन गौरव पुरस्कार २०२४ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

 

पंडितराव भारुड यांनी आत्तापर्यंत साहित्यिक, सामाजिक ,शैक्षणिक ,उl उद्योजकता या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले असून ते सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार करत आले आहेत. क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले मागासवर्गीय वाचनालय मंडळ संवत्सर यांच्या वतीने सातत्याने महापुरुषाच्या जयंती पुण्यतिथी कार्यक्रम घेत असतात. त्याचप्रमाणे त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनावर गंडेतोडे ही अंधश्रद्धा निर्मूलनपर कादंबरी लिहली असून विद्रोही कविता संग्रह लाव्हा , तसेच महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित क्रांतीसूर्य नावाचं प्रबोधनात्मक पुस्तक , प्रिंटेड सर्किट बोर्ड, कै. माजी मंत्री शंकरराव कोल्हेसाहेब यांच्या जीवनावर विजयीगाथा नावाची चित्रफित देखील तयार केलेली आहे . त्याचप्रमाणे भारुड हे पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक वृत्तपत्रातून सामाजिक समस्या नेहमी मांडत असतात. भारुड यांचे विविध क्षेत्रातले उल्लेखनीय काम पाहून सम्राट फाउंडेशन व आदेश फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज जीवन गौरव पुरस्कार 2024 हा पुरस्कार देवून पंडितराव भारुड यांना सन्मानित केले आहे.

 

या यशाबद्दल पंडितराव भारुड यांचे कोपरगावच्या पहिल्या महिला आमदार स्नेहलताताई बिपिनदादा कोल्हे, संजीवनी उद्योग समूहाचे संस्थापक बिपिनदादा कोल्हे, औद्योगिक वसाहतीचे चेअरमन मा. श्री बिपिनदादा कोल्हे त्याचप्रमाणे संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे सन्माननीय विश्वस्त नितीनदादा कोल्हे, सन्माननीय विश्वस्त अमितदादा कोल्हे व संवत्सर ग्रामस्थ, तसेच कवी प्रशांत वाघ, राम गायकवाड, यांनी पंडित भारुड यांचे अभिनंदन केले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button