क्राईम

मतदानाला येताना त्याने चक्क लपवून कुऱ्हाड आणली,ईव्हीएम मशिनवरच कुऱ्हाडीनं घाव , घडल कुठे ?


लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 13 राज्यांतील 88 लोकसभा मतदारसंघांत मतदान होत आहे. या टप्प्यात उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील प्रत्येकी 8 जागांसाठी आणि बिहारमधील 5 जागांसाठी मतदान पार पडत आहे.



राज्यातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशीम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या लोकसभा मतदारसंघांत शुक्रवारी(ता. 26) रोजी मतदान होत आहे. मतदारांचा मोठा प्रतिसाद दिसून येत आहे.

याचदरम्यान, एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नांदेडमध्ये एका युवकाने कुऱ्हाडीने चक्क ईव्हीएम (EVM) मशीन फोडल्याची धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. साधारण 500 हून अधिक लोकांचं मतदान या मतदानकेंद्रावर सकाळपासून झालं होतं

महाराष्ट्रातील आठ मतदारसंघांत मतदान सुरू आहे. त्यात नांदेडचादेखील समावेश आहे. पण या जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार शुक्रवारी दुपारी घडला. बिलोली तालुक्यातील रामतीर्थ गावात एका युवकाने कुऱ्हाडीने ईव्हीएम मशीन फोडल्याची घटना समोर आली आहे .भैय्यासाहेब येडके हा युवक शुक्रवारी मतदानासाठी आला होता. पण मतदानाला येताना त्याने चक्क लपवून कुऱ्हाड आणली.

केंद्रामध्ये दाखल झाल्यानंतर मतदान करण्याऐवजी त्यानं ईव्हीएम मशिनवरच कुऱ्हाडीनं घाव घातला. यामुळं मशिनचं नुकसानं झालं. यानंतर पोलिसांनी तत्काळ या येडके या तरुणाला ताब्यात घेतले. पण घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. तसेच मतदान केंद्रावरील सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे.

लोकसभेच्या नांदेड मतदारसंघात काँग्रेसमधून नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी मुख्यमंत्री राज्यसभेतील भाजपचे विद्यमान खासदार अशोक चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघ गेल्या निवडणुकीत भाजपने जिंकला तेव्हा अशोक चव्हाण हेच काँग्रेसकडून उमेदवार होते. परंतु गेल्या पाच वर्षांत घडलेल्या राजकीय घडामोडीमुळे तेच चव्हाण आज भाजपचे उमेदवार प्रताप चिखलीकर यांच्यासाठी मतं मागताना दिसत आहेत.

नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात कधीकाळी एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले चव्हाण- चिखलीकर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात गळ्यात गळे घालून फिरले. चिखलीकरांच्या प्रचाराला अशोक चव्हाण (Ashok Chavan) कसे याचे आश्चर्य तुम्हाला वाटत असेल? अशा शब्दात चव्हाण यांनी नांदेडकरांची फिरकी घेतली. परंतु भाजपच्या अब की बार 400 पार मिशनमध्ये नांदेडमधून प्रताप पाटील चिखलीकर (Paratp Patil chikhlikar) यांचा नंबर सर्वात वरचा असेल, असा दावाही केला आहे.

लोकसभा निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्याचे मतदान सुरू असतानाच सुप्रीम कोर्टाने आज ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटबाबत महत्त्वाचा निकाल दिला आहे. निवडणुकांमध्ये ईव्हीएमचाच वापर होईल, पुन्हा मतपत्रिका येणार नाहीत, असे कोर्टाने स्पष्ट केले आहे. त्याचप्रमाणे ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटमधील पावत्यांची शंभर टक्के पडताळणी करण्याच्या सर्व याचिकाही कोर्टाने फेटाळून लावल्या आहेत.

कोर्टाने निकाल देताना निवडणूक आयोगाला दोन महत्त्वाचे आदेशही दिले आहेत. व्हीव्हीपॅटमधील पावत्या ४५ दिवसांपर्यंत जतन करून ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. तसेच सिंबल लोडिंग युनिटही मतदानानंतर सील करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button