मुख्यमंत्री शिंदे यांच्या ठाण्यातील लुईसवाडी निवासस्थानाभोवतीही पोलिसांचे विशेष सुरक्षाकवच

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील खासगी निवासस्थानाला आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानाच्या धर्तीवर ठाणे पोलिसांनी सुरक्षा पुरविली आहे.
याच सुरक्षाव्यवस्थेचा ठाण्याचे सह पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी शनिवारी आढावा घेतला.

शिंदे यांची मुख्यमंत्रिपदी निवड झाल्यानंतर त्यांना तत्काळ झेड प्लस सुरक्षा पुरविण्यात आली आहे. अजून तरी त्यांनी मुंबईतील वर्षा हे शासकीय निवासस्थान ताब्यात घेतलेले नाही. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानासह मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ या निवासस्थानांच्या धर्तीवरच आता मुख्यमंत्री शिंदे यांच्या ठाण्यातील लुईसवाडी निवासस्थानाभोवतीही पोलिसांचे विशेष सुरक्षाकवच उभारले आहे.