ताज्या बातम्याबीडमहत्वाचे

बीड शहर गूढ आवाजाने हादरले.. नागरिकांमध्ये भीती

बीड : संपूर्ण शहर आज मंगळवार (6-2-2024 ) रात्री सव्वा आठ ते साडे आठच्या सुमारास गूढ आवाजाने हादरले. मोठा आवाज झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. 

बीडचे तहसीलदार सुहास हजारे यांनी सांगितले की, आवाजानंतर अनेकांनी फोन करुन आमच्याकडे विचारणा केली. त्यानंतर आम्ही आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेशी संपर्क करत माहिती जाणून घेतली असता भू वैज्ञानिक रोहन पवार म्हणाले, हा आवाज म्हणजे भूगर्भातील पाणी पातळी कमी-जास्त झाल्यानंतर पोकळी निर्माण होते, त्यावेळी हवेचा दाब तयार झाल्यानंतर जमिनीतून असे आवाज येतात.

बीड शहर आणि परिसर मंगळवारी (दि.6) रात्री 8 वाजून 22 मिनिटांनी प्रचंड मोठ्या गुढ आवाजाने हादरला. अनेकजण या आवाजाने घराबाहेर पळत आले तर काहींना हा आवाज म्हणजे भूकंप असल्याचे वाटले. अन् प्रत्येकाने एकमेकांना विचारणा सुरु केली. मात्र हा आवाज नेमका कशाचा होता? याची पुष्टी होवू शकली नाही, हा आवाज म्हणजे भूगर्भीय हालचाल आणि जमिनीतील हवेच्या पोकळीतून झाला असल्याची चर्चा होत राहिली.

जगातील  सर्वात विनाशकारी भूकंप; एकाचा भारतालाही तडाखा; चिलीमध्ये 10 मिनिटे जमीन थरथरली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button