क्राईमताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्र

न्यायालयातच पतीचा पत्नीच्या गळ्यावर कटरने वार पत्नी गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल


परभणी : परभणीत घटस्फोटाच्या सुनावणीसाठी आलेल्या पतीने न्यायालयातच भयानक कृत्य केले आहे.
घटस्फोटाची सुनावणी (Divorce Hearing) न्यायालयामध्ये सुरु असताना तडजोड न झाल्याने रागावलेल्या पतीने हे कृत्य (Crime News) केल्याचे समजते. न्यायालयाच्या आवारातच काय घडले?न्यायालयातच पतीचा पत्नीच्या गळ्यावर कटरने वार
ज्ञानेश्वर खनपटे अस या आरोपी पतीचे नाव असून परभणी न्यायालयात त्यांच्या पत्नी वैष्णवी यांच्या घटस्फोटाबाबत सुनावणी सुरु होती. सुनावणी सुरु असताना पत्नी वैष्णवीने तडजोड करण्याबाबत नकार दिल्यामुळे रागावलेल्या पतीने न्यायालयातून बाहेर पडताना पत्नीच्या गळ्यावर कटरने वार करून पत्नी वैष्णवीला गंभीर जखमी केले आहे. पत्नीच्या गळ्यावर पतीने कटरने वार केल्याची घटना जेएमएफसी न्यायालय परिसराच्या स्वच्छता गृहाजवळ घडली. हा प्रकार घडल्यानंतर नवा मोंढा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला ताब्यात घेतले आहे.
जखमी झालेल्या महिलेला उपचारासाठी परभणीच्या एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून या ठिकाणी महिलेवर उपचार करण्यात येत आहेत. पत्नी वैष्णवी या घटस्फोटाच्या सुनावणीसाठी परभणीच्या न्यायालयात आल्या असता पतीने त्यांच्यावर हा जीवघेणा हल्ला केला, आरोपी पतीला परभणीच्या नवा मोंढा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे…

पत्नी वैष्णवीची प्रकृती सुधारल्यानंतर याप्रकरणी तिचा जबाब नोंदवून आरोपी पती ज्ञानेश्वर खनपटे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. पत्नीने घटस्फोटाच्या सुनावणी दरम्यान तडजोड न केल्यामुळे संतापलेल्या पतीने हे भयानक कृत्य असल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, या घटनेचे मुख्य कारण गुन्हा दाखल झाल्यानंतर समोर येणार आहे. परभणीतील न्यायालयाच्या आवारातच ही भयंकर घटना घडल्यामुळे परिसरात गोंधळ तसेच दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं. घटस्फोटाच्या सुनावणीसाठी कोर्टाच्या परिसरातच पतीने पत्नीच्या गळ्यावर कटरने वार केल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

✍️✍️हे ही वाचा

लोकशाही न्युज  वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

नवगण डोअर बीड  वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन

नवगण न्युज  वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या !


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button