जमीन आपल्या नावावर आई करून देत नसल्याने आईचा खून

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


सांगली : एका मुलाने जमीन आपल्या नावावर आई करून देत नसल्याने आईचा खून केल्याची दुर्देवी घटना जत तालुक्यातील व्हस्पट येथे घडली आहे एकुलता एक मुलगा सुरेश कोरे याने आईचा खून केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
शांताबाई आनप्पा कोरे ( वय ५०) असे मृत आईचे नाव आहे. हल्लेखोर मुलगा सुरेश कोरे यास जत पोलिसांनी अटक केली आहे . वेळेस पेठ हद्दीत पवार कुटुंबाची संयुक्त शेत जमीन आहे सुरेश यांचे वडील अनप्पा कोरे यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर ही जमीन आईने आपल्या एकट्याच्या नावावर करून घ्यावी अशी मुलाची मागणी होती. त्यातूनच गेले काही दिवस आई व मुलगा यात वाद चालू होता. रविवारी दुपारी शेतामध्ये आई व मुलगा यांच्यात वादावादी झाली या वादातून सुरेशने आईच्या डोक्यात दगड खालून आणि दगडाने ठेचून खून केला.

✍️✍️हे ही वाचा

लोकशाही न्युज  वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

नवगण डोअर बीड  वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन

नवगण न्युज  वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या !