7.1 C
New York
Saturday, December 9, 2023

Buy now

नवऱ्याकडून घेतला स्मार्टफोन अन सोशल मीडियावरच्या फ्रेण्डसोबत गेली पळून..

spot_img

आग्र्यामध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. नवऱ्याला बायकोचा हट्ट पुरवणे अंगाशी आले आहे. महिलेने आपल्या नवऱ्याकडे हट्ट करुन स्मार्टफोन खरेदी केला. त्यानंतर सोशल मीडियावर अकाऊंट बनवून नवीन मित्र बनवले.

सतत चॅटिंग सुरु असल्याने नवऱ्याने मोबाईल फोडून टाकला. त्यामुळे नाराज झालेली महिला आपल्या सोशल मीडियावरच्य़ा फ्रेण्डसोबत पळून गेली. त्यानंतर नवऱ्याने पोलिसांकडे धाव घेतली आणि चार महिन्यानंतर पोलिसांच्या हाती ती महिला लागली आहे.

महिलेच्या लग्नाला पंधरा वर्ष झाली असून त्यांना दोन मुले आहेत. तिच्या नवऱ्याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, महिलेने हट्टाने नवऱ्याकडून स्मार्टफोन घेतला होता. त्यानंतर तिने फेसबुक, इंस्टाग्राम आणि अन्य सोशल साईट्सवर आपले अकाऊंट ओपन केले. तिने अनेक नवे मित्र बनवले. त्यानंतर पत्नी एक दिवस तिच्या मैत्रीणीकडे गेली होती आणि तिने तिला अशा ग्रुपमध्ये अॅड केले ज्यामध्ये बरेच सारे तरुण होते. ती रात्र रात्र त्या ग्रुपमध्ये चॅटींग करायची. त्याला ती सतत मोबाईलवर असल्याचे कळल्यावर त्याने तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला मात्र तिने काहीच ऐकले नाही. अखेर संतापून एकदिवस त्याने पत्नीचा मोबाईलच फोडून टाकला. त्यानंतर महिलेने नवऱ्य़ाच्या नकळत आणखी मोबाईल आणला. दरम्यान 16 ऑक्टोबर 2022 तिने मित्राच्या सांगण्यावरुन घर सोडून गेली आणि सोबत पैसे आणि दागिनेही घेऊन गेली.

याप्रकरणी महिलेच्या घरच्यांनी मुलगी बेपत्ता होण्याबरोबरच तिच्या पतीविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी तक्रारीत म्हंटले आहे की, तिचा नवरा फार संशयी होता आणि तिला मारहाण करायचा. त्यांनी तिच्या नवऱ्यावरच ती गायब असल्याचा आरोप केला होता. आता ही महिला सापडली असून ती आपल्या पतीसोबत राहू इच्छित नाही. पोलिसांनी महिलेच्या स्टेटमेण्ट घेतल्यानंतर योग्य निर्णय देण्यात येईल.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles