ताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचेसंपादकीय

‘जरा याद करों कुर्बानी…’; 14 फेब्रुवारी 2019 झाला होता पुलवामा हल्ला भारताच्या इतिहासातला काळा दिवस


14 फेब्रुवारी भारताच्या इतिहासात या दिवसाची नोंद काळा दिवस म्हणून आहे.



आज पुलावामा हल्ल्याला (Pulwama Attack) चार वर्ष पूर्ण झाली आहेत. 14 फेब्रुवारी 2019 रोजी भारतीय जवानांवर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला होता. पुलवामा हल्ल्यात CRPF चे 40 जवान शहीद झाले होते. आज पुलवामा हल्ल्याला (Pulwama terror attack) चार वर्षे पूर्ण झाली असून देशभर शहीदांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.

14 फेब्रुवारी 2019 झाला होता पुलवामा हल्ला

पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी सकाळी पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी CRPF च्या बसवर हल्ला केला होता. त्यावेळी बसमधून प्रवास करत असलेले 40 CRPF जवान शहीद झाले. या घटनेने संपूर्ण देश हादरला. या भ्याड हल्ल्यामागे जैश-ए-मोहम्मद या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेचा हात होता. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राइक केला.

भारताचे 40 जवान शहीद

14 फेब्रुवारी 2019 रोजी दुपारी 300 किलो स्फोटकांनी भरलेल्या वाहनाने सीआरपीएफच्या वाहनाला धडक दिली आणि लष्करी ताफा उडवला. पुलवामा हल्ला भारतातील मोठ्या दहशतवादी हल्ल्यांपैकी एक मानला जातो. यामध्ये भारताचे 40 जवान शहीद झाले. मात्र, या हल्ल्यानंतर भारताने यापूर्वी कधीही झालं नव्हतं ते केलं. भारताने या भ्याड दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर दिलं. भारतीय जवानांनी पुलावामा हल्ल्याला आपल्या बालाकोट सर्जिकल स्ट्राईकच्या रूपानं प्रत्युत्तर दिलं.

अवघ्या 12 दिवसांत ‘नापाक’ पाकिस्तानकडून घेतला बदला

पुलवामाच्या भ्याड हल्ल्यात 40 शूर जवान शहीद झाले. पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोराजवळील लेथपोरा भागात झालेल्या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानची दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने घेतली. त्यानंतर भारताने अवघ्या 12 दिवसांत ‘नापाक’ पाकिस्तानकडून बदला घेतला. भारताने 26 फेब्रुवारीला बालाकोट एअर स्ट्राइक करून जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांचा खात्मा केला.

नक्की काय घडलं?

भारताच्या इतिहासात 14 फेब्रुवारी हा काळा दिवस मानला जातो. कारण याच दिवशी 2019 मध्ये पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते. जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरून सुमारे 2500 जवानांना घेऊन सीआरपीएफचा ताफा बसमधून जात होता. त्या दिवशीही रस्त्यावर सामान्य वाहतूक होती. सीआरपीएफचा ताफा पुलवामाला पोहोचला त्यावेळी रस्त्याच्या बाजूने येणारी एक कार सीआरपीएफच्या ताफ्यासोबत जाणाऱ्या वाहनावर आदळली. कार ताफ्याला धडकताच तिचा स्फोट झाला आणि या प्राणघातक हल्ल्यात 40 सीआरपीएफ जवान शहीद झाले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button