क्राईमपुणेव्हिडिओ न्युज

Video बापानेच दिली मलाला गोळ्या घालण्यासाठी 75 लाखाची सपारी


पुणे : पुण्यातील बांधकाम व्यावसायिक (Builder In Pune) धीरज दिनेशचंद्र आरगडे Dheeraj Dineshchandra Argade (वय 38 रा. कोहिनूर इस्टेट, मुळा रोड, वाकडेवाडी, खडकी) यांच्यावर जंगली महाराज रोडवर भरदिवसा गोळीबार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती.



ही घटना 16 एप्रिल रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास आरगडे हाऊस (Argade House JM Road) या ऑफिसच्या खाली असलेल्या रोडवर घडली होती. या गुन्ह्याच्या तपासात खळबळजनक माहिती समोर आली आहे. धीरज आरगडे यांचे वडील दिनेशचंद्र आरगडे (Dineshchandra Argade) यांनी 75 लाखांची खुनाची सुपारी (Supari Killing) दिल्याचे तपासात समोर आले आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने सहा जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून गावठी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतुस जप्त केले आहे (Pistol Seized). प्रॉपर्टीच्या वादातून (Property Dispute) वडिलांनी मुलाच्या खनाची सुपारी दिल्याचे तपासात निष्पन्न झाले.

याबाबत धीरज आरगडे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivaji Nagar Police Station) फिर्याद दिली. प्रविण उर्फ पऱ्या तुकाराम कुडले Pravin alias Parya Tukaram Kudle (रा. सुतारदरा), योगेश दामोदर जाधव Yogesh Damodar Jadhav (वय-39 रा. सुतारदरा कोथरुड -Sutardara Kothrud), चेतन अरुण पोकळे Chetan Arun Pokale (वय-27 रा. वारजे), प्रशांत विलास घाडगे Prashant Vilas Ghadge (वय-38 रा. वारजे जकातनाका), अशोक लक्ष्मण ठोंबरे Ashok Laxman Thombre (वय-48 एरंडवणा), दिनेशचंद्र उर्फ बाळासाहेब शंकरराव अरगडे Dineshchandra alias Balasaheb Shankarao Argade असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. प्रवीण कुडले हा रेकॉर्डवरील गुन्हेगार (Criminal On Police Records) आहे.

दाखल गुन्ह्याचा तपास करताना युनिट एकच्या पथकाने सतत चार दिवस जंगली महाराज रोड पासून ते सुतारदरा कोथरुड पर्यंत सरकारी व स्थानिक असे 200-250 सीसीटीव्ही कॅमेरे पाहून तांत्रिक विश्लेषण केले. त्यानुसार गोळीबार करणाऱ्या मुख्य आरोपी प्रविण तुकाराम कुडले (रा. सुतारदरा) याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे सखोल तपास केला. त्यावेळी त्याचा साथीदार योगेश दामोदर जाधव (वय-39 रा. सुतारदरा कोथरुड) याच्यासह गुन्हा केल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी जाधव याला ताब्यात घेतले.

आरोपी प्रविण कुडले याच्याकडे केलेल्या तपासादरम्यान काही दिवसांपूर्वी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याच्या (Chaturshringi Police Station) हद्दीतील स्काय स्टोरीज हॉटेल पाषाण (Sky Stories Pashan, Baner, Pune) या ठिकाणी देखील त्याने त्याचा साथीदार चेतन अरुण पोकळे (वय-27 रा. वारजे) याच्यासह फिर्यादी धीरज अरगडे यांच्यावर चाकुने गळ्यावर वार करण्याचा प्रयत्न केला (Attempt To Murder). मात्र, त्यांनी वार चुकवल्याने त्यांच्या मनगटावर चाकू लागल्याने जखमी झाले. पोलिसांनी चेतन पोकळे याला ताब्यात घेतले.

आरोपींकडे केलेल्या तपासामध्ये या गुन्ह्याचा कट रचुन सुपारी देणारे आरोपी निष्पन्न झाले. आरोपी प्रशांत विलास घाडगे (वय-38 रा. वारजे जकातनाका) व अशोक लक्ष्मण ठोंबरे (वय-48 एरंडवणा) यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशी मध्ये गुन्ह्याच्या कटाचा मुख्य सुत्रधार धिरज आरगडे यांचे वडिल दिनेशचंद्र उर्फ बाळासाहेब शंकरराव अरगडे यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीमध्ये त्यांनी मुलगा धीरज याला जीवे मारण्यासाठी 75 लाखांची सुपारी दिल्याची कबुली दिली. याप्रकरणी पोलिसांनी 6 जणांना अटक केली आहे.

व्हिडिओ पहा !👇👇👇👇

https://www.instagram.com/reel/C55fMmKvZCE/?utm_source=ig_web_copy_link

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Pune CP Amitesh Kumar), पोलीस सह आयुक्त प्रविण पवार (Pravin Pawar IPS), अपर पोलीस आयुक्त गुन्हे शैलेश बलकवडे (Shailesh Balkawade IPS) , पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende), सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-1 सुनिल तांबे (ACP Sunil Tambe) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, दरोडा वाहन चोरी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक रंगराव पवार, सहायक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर, पोलीस उपनिरीक्षक रमेश तापकीर, गौरव देव, राम दळवी, गुन्हे शाखेकडील पोलीस अंमलदार राहुल मखरे, दत्ता सोनवणे, अनिकेत बाबर, आण्णा माने, अभिनव लडकत, शशिकांत दरेकर, महेश बामगुडे, निलेश साबळे, आय्याज दड्डीकर, शुभम देसाई, विठ्ठल साळुंखे, महेश सरतापे, अमोल आव्हाड, राजेंद्र लांडगे, सयाजी चव्हाण, विजु कांबळे, चंद्रकांत उर्फ मॅगी जाधव, धनंजय ताजणे, रवि लोखंडे, निखील जगदाळे, रविंद्र रोकडे, महिला पोलीस अंमलदार रुक्साना नदाफ यांच्या पथकाने केली.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button