ताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

VIDEO : बकऱ्या चारणाऱ्या मुलीचे ३६० डिग्री सिक्स पाहा


पुरुष क्रिकेटपटूंच्या बरोबरीने आता महिला क्रिकेटर्सही आपली वेगळी ओळख निर्माण करतायत. पुरुषांप्रमाणे महिला क्रिकेटर्सही टॅलेंटमध्ये कुठेही कमी नाहीयत. त्याचच एक उदहारण राजस्थानच्या एका गावात दिसून आलय. राजस्थानात एका 14 वर्षाच्या मुलीची बॅटिंग पाहून तुम्ही टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर सूर्यकुमार यादवची आठवण येईल. सूर्यकुमार यादवला टीम इंडियात मिस्टर 360 डिग्री म्हणतात. सूर्यकुमार फाइन लेग, थर्ड मॅनला खूप सहजतेने सिक्स मारतो. या मुलीची बॅटिंग पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच सूर्यकुमार यादवची आठवण येईल. 

सोशल मीडियावर या मुलीच्या बॅटिंगचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होतोय. राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यातील शिव शेरपुरा कानासर गावात ही मुलगी राहते. या 14 वर्षाच्या मुलीच नाव मूमल मेहर आहे.

मूमल काय करते?

अत्यंत सहजतेने फोर-सिक्स मारणारी मूमल मेहर अवघ्या 14 वर्षांची आहे. ती 8 व्या इयत्तेत शिक्षण घेतेय. वडिल मठार खान शेतकरी आहेत. आर्थिक परिस्थिती बेताची आहे. मूमला क्रिकेटची भरपूर आवड आहे. पण तिच्याकडे खेळण्यासाठी साधे बूट नाहीयत. घराच बांधकाम सुद्धा अर्धवट आहे.

मूमलला कोण कोचिंग देतय?

मुलीला क्रिकेटच चांगलं प्रशिक्षण देता येईल, इतकं या कुटुंबाचं उत्त्पन नाहीय. सध्या शाळेतील शिक्षक रोशन खान मूमलचे कोच आहेत. जे तिला क्रिकेटचे बारकावे शिकवतायत. रोशन खान दररोज तीन ते चार तास मूमलकडून क्रिकेटची प्रॅक्टिस करुन घेतात.

बकऱ्या चरण्यासाठी घेऊन जाते

क्रिकेट खेळण्याबरोबरच मूमलला घरच्या कामकाजात आईला मदत करावी लागते. ती बकऱ्या चरण्यासाठी घेऊन जाते. मात्र एवढ सगळं करुनही मूमलने तिची क्रिकेटची आवड जपलीय. मूमलचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तिला टीम इंडियात घेण्याची मागणी होऊ शकते. तिला योग्य ट्रेनिंग मिळाल्यास मूमल लवकरच टीम इंडियात दिसू शकते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button