वंदे भारत ट्रेनचे दरवाजेच उघडले नाहीत, प्रवाशांना गार्डच्या केबिनमधून उतरवले

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


शिर्डीहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला आलेल्या वंदे भारत ट्रेनचे दरवाजे तांत्रिक बिघाडामुळे रात्री साडेदहाच्या सुमारास दादर स्थानकात उघडले नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रवाशांना गार्डच्या केबिनमधून बाहेर काढण्याची नामुष्की रेल्वेवर ओढवली आहे.

वंदे भारत आरामदायी ट्रेन सायंकाळी 5.25 वाजता शिर्डीहून मुंबईसाठी सुटली होती. ही गाडी ठाणे स्थानकात आला असता तेथे प्रवाशांना उतरण्यासाठी गाडीचे दरवाजेच उघडले नाहीत. त्यामुळे प्रवाशांना गार्डच्या केबिनमधून उरतवण्यात आले. त्याचीच पुनरावृत्ती दादर स्थानकात झाली. त्यामुळे प्रवशांचा गोंधळ उडाला होता. गाडीचे दरवाजे न उघडल्याने प्रवासी गार्डच्या केबिनमधून उतरत असल्याचा व्हिडीओ ट्विटरवर व्हायरल झाला आहे.