ताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचेसंपादकीय

विनाशकारी भूकंपात हसरा चेहरा; १२८ तासानंतर ढिगाऱ्याखालून नवजात बाळ सुखरुप


तुर्की आणि सिरिया येथे झालेल्या भूकंपात आत्तापर्यंत जवळपास २१ हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. या आकड्यात वाढ होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. या विनाशकारी भूकंपात हजारो लोकांना जिवंत बाहेर काढण्यात यश मिळत आहे.दरम्यान, विनाशातही आशेचा किरण पाहायला मिळाला. १२८ तासानंतर ढिगाऱ्याखालून एका नवजात बाळाला सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. (Turkey Earthquake Baby Found Alive In Rubble After 128 Hours )

टर्कीच्या हेते प्रॉविन्स येथे एका घराच्या ढिगाऱ्याखालून एक नवजात बाळाला सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. १२८ तासांच्या अथक प्रयत्नानंतर या बाळाला जिवंत बाहेर काढण्यात आले. या बाळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

या व्हिडीओमध्ये बाळाला पाहिले बालाचा हसरा चेहरा पाहायला मिळत आहे. हसरा चेहरा, टपोरे डोळे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.

वियोन न्यूज या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण टर्कीमध्ये बचाव कार्य सुरु असताना एका इमारतीच्या ढिगाऱ्याखालून दोन महिन्यांचे एक बाळ भूकंपाच्या १२८ तासांनंतर सुखरुप बाहेर काढले गेले.

टर्की आण सीरियामध्ये ६ फेब्रुवारी रोजी ७.८ रिश्टर स्केलच्या भूकंपाचे धक्के बसले होते. त्यानंतर जगभरातून मदतीचा ओघ दोन्ही देशाकडे सुरु झाला आहे. भारताने ऑपरेशन दोस्तच्या अंतर्गत मदत पाठविली आहे. भारताची एनडीआरएफ टीम टर्की आणि सीरियामध्ये बचाव कार्य करत आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button