ताज्या बातम्या

जेजुरीत पॅरामोटर घरावर कोसळले, अपघातात महिला जखमी


जेजुरी येथील कडेपठार रस्त्यावर असलेल्या फ्लाईंग रायनो पॅरामोटरिंग एडवेंचर स्पोर्ट सेंटरचे एक पॅरामोटर अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने चिंचेच्या बागेजवळील एका पत्र्याच्या घरावर कोसळले.या अपघातात पॅरामोटरिंग करणारी युवती अस्था प्रदिप माने ( वय , १७ रा.वाकड,पुणे ) व पायलट चंद्रकांत महाडिक हे जखमी झाले आहेत.

आज सायंकाळी पाच वाजता पॅरामोटरने अस्था माने यांना घेऊन उड्डाण केले.काही वेळातच पॅरामोटर छत्रीच्या मंदिराजवळ आल्यावर वाकडे-तिकडे हेलकावे खाऊ लागले व ते खाली आले. भरवस्तीमध्ये असलेल्या दरेकर वाड्यातील सतिश गोडसे यांच्या पत्र्याच्या घरावर ते कोसळले.रविवार असल्यामुळे या परिसरामध्ये भाविकांची प्रचंड गर्दी होती. हे पॅरामोटर घरावर कोसळल्याने सुदैवाने मोठी जीवितहानी टळली.या घरामध्ये एक महिला स्वयंपाक करीत होती.घाबरुन ती बाहेर पळत आली.पॅरामोटर कोसळल्याने घराची भिंत पडली,पत्रे तुटले.या ठिकाणी असलेल्या ग्रामस्थांनी पायलट व जखमी युवतीला तातडीने दवाखान्यात पाठवले.

जेजुरी तीर्थक्षेत्र असल्याने गेल्या वर्षी पर्यटकांसाठी पॅरामोटरिंग सेंटर उभारण्यात आले आहे.पॅरामोटरमध्ये बसून जमिनीपासून १२०० फुटावरून जयाद्री पर्वतावरअसलेले खंडोबा मंदिर,कडेपठार मंदिर व निसर्गरम्य परिसर पाहण्याचा आनंद भाविक व पर्यटक घेतात.कडेपठारच्या डोंगर रस्त्यावरील एका मैदानात हे पॅरामोटरिंग सेंटर सुरू वातावरणातील अनुकूलता बघूनच पर्यटकांना रायडिंगसाठी नेण्यात येते.प्यारा मोटरमध्ये पायलट व एक प्रवासी एकावेळी बसू शकतो.जेजुरी पोलिसांनी अपघाताची नोंद दाखल केली आहे. पुणे येथील प्रदिप माने हे आपल्या परिवारासह जेजुरी येथे खंडोबाच्या दर्शनासाठी आले होते.पाच महिन्यापुर्वी खासदार सुप्रिया सुळे यांनी या पॅरामोटरमध्ये बसून पर्यटनाचा आनंद घेतला होता.ही बातमी वृत्तपत्रामध्ये अस्था माने हीने वाचली होती त्यामुळे आवर्जुन ती पॅरामोटरींगची सफर करण्यासाठी आली होती. दुर्दैवाने हा अपघात घडला.

मोठी जिवीत हानी टळली

आज खंडोबाचा रविवार असल्याने जेजुरीत एक लाखाच्यावर भाविक आले होते.अपघात झालेल्या जागेजवळच असलेल्या चिंचेच्या बाग परिसरामध्ये हजारो भाविक देवकार्य करण्यासाठी थांबले होते.पॅरामोटर कोसळलेल्या ठिकाणापासून पन्नास फूटावर रस्ता असून या रस्त्यावर खूप गर्दी होती. सुदैवाने पॅरामोटर वाड्यात पडल्याने मोठी जीवीत हानी टळली. हा अपघात झाल्यानंतर या परिसरात घबराट पसरली.

चंद्रकांत महाडिक ( पायलट ) नेहमी प्रमाणे आज प्रवासी घेऊन उड्डाण केले. कमी उंचीवरुन पॅरामोटर नेत असताना अचानक मशिनचा बोल्ट तुटून तो पंख्याला लागला. पंख्याचे पाते उडाल्याने बलुनची नायलॉन दोरी तुटली , त्यामुळे पॅरामोटर खाली आले.याठिकाणी रस्त्यावर भाविकांची खुप गर्दी होती.त्यामुळे बाजूच्या वाड्यात पॅरामोटर नेले.उंची कमी असल्याने खालचे बलुन उघडता आले नाही.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button