पद्मश्री प्राप्त दादा इदाते यांचा जाहीर सत्कार

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


 

पद्मश्री दादा इदाते यांचा जाहीर सत्कार

मुंबई : ( आशोक कुंभार ) मुंबई दादा इदाते हे अनेक वर्ष संघाचे महाराष्ट्र,गोवा,गुजरात राज्याचे बौद्धिक प्रमुख व महाराष्ट्र प्रांत कार्यवाह होते. तळागाळातील वंचित समाजासाठी काम करीत असताना संपूर्ण देशभर फिरून त्यांनी समाजातील गोर गरीबांचे दुःख जाणले वंचित,दुर्लक्षित अश्या भटक्या विमुक्त जाती जमातीचा सर्व्ह करून त्यांच्या विकासासाठी काय करायला हवे हे सरकारकडे मांडले त्यामुळे देशातील या समाजाची आकडेवारी त्यांनी आहवाल देवून सरकारकडे मांडला सरकारने समाजाच्या आर्थिक विकासाचा आराखडा तयार करून विकास करेल,असे उदगार पूर्व पेट्रोलियम मंत्री व पूर्व उत्तरप्रदेश राज्यपाल मा.राम नाईक यांनी काढले. बोरिवली पूर्व येथील फुलपाखरू उद्यान येथील राजर्षी शाहू महाराज संस्कार केंद्र येथील स्व. शैलजा विजय गिरकर सभाग्रहात आयोजित दादा इदाते सन्मान सोहळा कार्यक्रमात बोलत होते.यावेळी सन्मानचिन्ह,शॉल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.सत्काराला उत्तर देताना दादा म्हणाले की,या कामात वेळोवेळी रामभाऊ नाईक व यांच्या सारख्या अनेकांचे सहकार्य लाभले आहे.कोणत्याही पुरस्काराची अपेक्षा न ठेवता मी काम करीत राहिलो, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना आदर्श मानून समाजात काम करीत राहिलो. भटके विमुक्त जातिंकरता काम करणारे मा.आमदार श्री दौलतराव भोसले यांचे ही मार्गदर्शन घेतले.मला मिळालेला हा पद्मश्री पुरस्कार हा मी समाजाला अर्पण करतो, असे ही ते म्हणाले. या प्रसंगी आमदार श्री विजय भाई गिरकार म्हणाले की दादा कोकणातील ग्रामीण भागातील एका गावातून पुढे आले.त्यांनी वंचितांच्या मुलांसाठी मुलींसाठी शाळा सुरू केल्या संघाचे प्रचारक म्हणून प्रवास करून त्यांनी वंचितांचे व भटक्या विमुक्त समाजाचे प्रश्न समजून घेतले या बद्दल त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे हा त्यांचा उचित सन्मान आहे.या वेळी भागसंघचालक डॉ.मकरंदजी,समता परिषदेचे श्री अशोक कांबळे यांची ही यथोचित भाषण झाले.खासदार श्री गोपाल शेट्टी यांनी कामाच्या व्यापामुळे दादा यांना शूभेछ्या देवून गेले.यावेळी मंचावर संघ प्रांत अधिकारी श्री विलास भागवत, बोरिवली भागचालक श्री रोहित देशपांडे, भाजपा उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष श्री गणेश खणकर, विमुक्त घुमंतू परिषद महाराष्ट्र कार्यवाह श्री राजेंद्र भोसले,खजिनदार श्रीकुमार शिंदे,श्री सहदेव रसाळ ,भारतीय जनता पार्टी Vjnt चे महाराष्ट्र प्रदेश ऊपाध्यक्ष श्री बबन मोहिते यांची प्रमुख उपस्थीती होती

श्री मंगेश शिंगे,श्री विनोद चौगुले, पत्रकार व साहित्यिक श्री भारत कवितके,श्री संजय आहेर,श्री उमाजी शिंगे,महादेव रसाळ,संदेश रसाळ,संदेश भागवत,धृपद रवांदळे,श्री देवकुळे,ॲड.श्री संकेत कोलापटे,मोहन अलकुंटे,श्रीमती नीहारिका खोंदले,श्रीमती अर्चना लष्कर,ॲड.अनुराधा साळुंके, ॲड.शीतल काळे आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरीधर साळुंके यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री सहदेव रसाळ यांनी केले