ताज्या बातम्या

शेतात काम करताना भयानक घडलं; व्यक्तीच्या शरीराचे झाले तुकडे


शेतात काम करत असताना एका व्यक्तीसोबत एक अतिशय भयानक घटना घडली. यात एका ड्रायव्हरचा रोटावेटरमध्ये अडकून मृत्यू झाला आहे. ही घटना यावल तालुक्यातील डांभुर्णी गावात घडली.



विजय जानकीराम कोळी बाविस्कर (वय 35) असं या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. या प्रकरणी यावल पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

रोटावेटरमध्ये अडकून डांभुर्णी गावातील ड्रायव्हरचा मृत्यू झाला आहे. शेतात रोटर चालवत असताना ड्रायव्हरचा मागील बाजूला तोल गेला. यामुळे विजय बाविस्कर हे रोटरमध्ये अडकले. क्षणातच त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे झाले. घटनेत त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
  • .
Back to top button