पोलीसवाला गुंडा?येथे ओशाळली माणूसकी, लोप पावली नितीमत्ता; रक्षकच झाला भक्षक

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


 ठानेदार विनोद
चव्हाण यांच्या विरोधात आमरण उपोषण!

यवतमाळ : (आरनी ) पारवा पो.स्टे. अंतर्गत, सावळी सदोबा जवळ असलेल्या बारभाई येथील,आकाश भिकर राठोड यांना बेदम मारहाण करून खोट्या गुण्यात अडकवण्यासाठी धमकी देत. खोटे गुन्हे दाखल केल्यामुळे पारवा पोलीस स्टेशन विनोद चव्हाण यांच्या विरोधात दिनांक 25/01/2023 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण ला बसत असल्याचे निवेदनद्वारे कळविण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार बारभाई गट ग्राम पंचायत सरपंच प्रदीप बळीराम जाधव यांनी उपोषण करता यांना आई बहिणी विरोधात अश्लील शिवीगाळ व मारहाण केली होती. सदर प्रकरणी उपोषण करते तक्रार देण्यास गेले असता.पारवा ठाणेदार विनोद चव्हाण यांनी उपोषण करत्यास बेदाम मारहाण केली. तेव्हा बारभाई सरपंच आणि ठाणेदार यांनी संयुक्त रित्या मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
वरील संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी पांढरकवडा यांचेकडे निवेदन देऊन. मारहाण झाल्याचे ठिकाणचे सी.सी.टी.व्ही. फुटेज घेऊन, ठाणेदारावर कार्यवाही करण्याची मागणी केली होती.परंतु कसलीही कारवाई करण्यात न आल्यावर उपोषण करते, आकाश भिकर राठोड यांनी शेवटी रितसर जिल्हा पो.अधीक्षक यांच्याकडे निवेदन देऊन न्याय मिळण्यासाठी दिनांक 25/01/2023 न्याय मिळोपर्यंत परिवार सह उपोषणाला बसत आहे.
सदर प्रकरणी महाराष्ट्राचे गृहमंत्री, महाराष्ट्राचे पोलीस आयुक्त,व जिल्ह्याचे पालकमंत्री, आमदार,खासदार,यांना माहिती कळविली आहे.