जनरल नॉलेजव्हिडिओ न्युज

करोडपती पानवाला ! कोट्यवधींचे दागिने घालून विकतो पान,ज्याने राष्ट्रपतींनाही लावला चुना


 



राजस्थान : प्रत्येक रस्त्याच्या कडेला किंवा एखाद्या कोपऱ्यावर तुम्ही पानाची टपरी पाहिली असेल. पानाचं छोटसं दुकान टाकून अनेक लोक आपला उदरनिर्वाह करतात. 10 ते 15 रुपयांचं पान विकून हे पानाची टपरी चालवणारे दोन वेळेच्या जेवणाची व्यवस्था करत घर चालवतात.

पण, तुम्ही आतापर्यंत कधी करोडपती पानवाला पाहिला नसेल. सध्या एक पानवाला खूप प्रसिद्ध आहे. यामध्ये विशेष म्हणजे हा पानवाला कोट्यधीश आहे आणि त्यातच हा सोन्याचे दागिने घालून टपरीवर बसून पान विकतो. हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटलं असेल, पण हे खरं आहे. महत्त्वाचं म्हणजे या सोन्याचे दागिने घालणाऱ्या पानवाल्याला बघायला दूर-दूरहून लोक येतात.

कोट्यधीश पानवाला

हा पानवाला दोन कोटींचे दागिगे अंगावर घालून पान विकतो. हा पानवाला पानाच्या टपरीच्या कमाईनेच इतका श्रीमंत झाला आहे की, तो आता कोट्यधीश आहे. राजस्थानमधील बीकानेर येथील या पानवाल्याची सध्या सर्वत्र चर्चा आहे. महत्त्वाचं म्हणजे या पानवाल्याच्या टपरीवरील पानांपेक्षा लोक या व्यक्तीला पाहण्यासाठी आणि भेटण्यासाठी येथे येतात. या टपरीवरील पानांपेक्षा या व्यक्तीची सोशल मीडियावर जास्त चर्चा आहे. सुमारे दोन किलो वजनाचं सोनं घालून हा पानवाला पान विकतो.

सोन्याचे दागिने घालून विकतो पान

हा पानवाला सोन्याच्या अंगठ्या, हार, कानातले घालून पान विकतो. हा पान विक्रेता दोन कोटींचे सोने घालून पान विकतो. या पानवाल्याने सांगितलं की, तो दोन किलोपेक्षा जास्त वजनाचे सोन्याचे दागिने घालतो. इतके दागिने घालून तो व्यक्ती आपली पानाची टपरी उघडतो आणि मग पान बनवून लोकांना खायला घालतो. या कोट्धीश पानवाला पाहण्यासाठी दररोज लोकांची गर्दी जमते.

व्हिडिओ पहा !👇👇👇👇

https://www.instagram.com/reel/C55fMmKvZCE/?utm_source=ig_web_copy_link

पानही खूप प्रसिद्ध

राजस्थानच्या बिकानेरच्या सट्टा बाजारात असलेल्या मुळसा फुलसा पान विक्रेता फार प्रसिद्ध आहे. या पान विक्रेत्याचं पान खूप प्रसिद्ध आहे, त्यासोबतच सोन्याचे दागिने घालून पान विकणारा मालकही खूपर प्रसिद्ध आहे. मुळसा फुलसा पानाचं दुकान सुमारे 93 वर्षे जुनं आहे. पूर्वी हे मूळचंद आणि फूलचंद नावाचे भाऊ चालवत होते. पण आता फुलचंद मूलचंद यांचा मुलगा हे पानाचं दुकान चालवत आहे. या दुकानातील पान खाणाऱ्यांमध्ये भारताच्या माजी राष्ट्रपतींचाही समावेश आहे. पानाचे अनेक प्रकार येथे उपलब्ध आहेत. येथील पान खाण्यासाठी लोक फार लांबून येतात. पानाची किंमतही पंधरा ते वीस रुपयांच्या दरम्यान आहे, ज्यामुळे ते खिशाला परवडणारं आहे.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button