ज्या डिजीटल चॅनलचे नाव समोर करूण माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला त्याच्यांशी माझा संबंध नाही – सोमनाथ मोटे

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


ज्या डिजीटल चॅनलचे नाव समोर करूण माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला त्याच्यांशी माझा संबंध नाही

बदनामी करनाऱ्या विरोधात न्यायालयात धाव घेणार

गेवराई दि २२ ( वार्ताहार ) शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीच्या प्रचारा दरम्यान भारतिय जनता पार्टी कडून गेवराई याठिकाणी कार्यक्रम  आयोजित करण्यात आला होता याठिकाणी या कार्यक्रमात माजी मंत्री तथा राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे व भारतिय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकूळे यांच्यात भाषनावरून बोलने झाले व त्यांच्या व्हिडीओ प्रसारीत झाला या प्रकरणी संबंधीत युट्यूब चॅनलवर गुन्हा दाखल झाला परंतू ज्या चॅलनवर हा व्हिडीओ दाखवला गेला या चॅनलचा मी वार्ताहार नाही तसेच माझे नाव सदरच्या गुन्ह्यात गोवले असल्याची प्रतिक्रीया पत्रकार सोमनाथ मोटे यांनी दिली आहे .

याबाबद सविस्तर माहिती अशी की , भारतिय जनता पक्षाचे शिक्षक मतदार संघाचे उमेदवार किरण पाटील यांच्या प्रचार सभा गेवराई गोदावरी सभागृह याठिकाणी आयोजित करण्यात आली होती तसेच व्याजपिठावर आगोदर भाषण कोण ? करणार यावरून माजी मंत्री राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे व प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकूळे यांच्यात शाब्दीक संवाद झाला यांचे रेकॉर्ड निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे आहे परंतू ज्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांने ज्या चॅनलचा आधार घेऊन माझे नाव या गुन्ह्यात गोवले आहे त्या चॅनलशी माझा कसलाही संबंध नाही तसेच तसेच मी त्यांचा वार्ताहार किंवा पत्रकार नाही माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला गेला आहे तसेच पोलिस तपासात सत्य समोर येईल परंतू माझी बदनामी करनाऱ्या व्यक्ती विरोधात आपण न्यायालयात धाव घेऊ असेही सोमनाथ मोटे यांनी सांगितले आहे .