ताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचे

अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला सुरुंग, बँका डबघाईला..


बँकिंग संकटामुळे अमेरिकन अर्थव्यवस्था हादरली आहे. सिलिकॉन बँकेला टाळे लागले आहे.



सिग्नेचर बँक, फर्स्ट रिपब्लिक बँका दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहेत. अमेरिकेतील 189 बँकांवर संकटाचे ढग आहेत. अमेरिकेतील बँकिग संकट भारत आणि आशियातील बाजारासाठी (Indian, Asian Market) चांगली संधी ठरु शकते. अमेरिकेत आलेले बँकिंग संकटानंतर गुंतवणूकदार आता भारतीय आणि आशियातील बाजाराकडे वळाले आहेत. वैश्विक गुंतवणूकदारांना आशिया आणि भारतीय बाजारावरील भरोसा वाढला आहे. त्यांना चीन आणि भारतातील गुंतवणूक सुरक्षित आणि फायदेशीर वाटत आहे. अमेरिकेचे केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हचे आक्रमक व्याजदर धोरण जनतेच्या गळ्याशी आले आहे. तर बाजारातून अपेक्षित परतावा मिळत नसल्याने गुंतवणूकदार निराश आहेत.

गुंतवणूकदारांचा रोख आशियाकडे
अमेरिकेतील बँकिंग संकटामुळे गुंतवणूकदारांनी तिथला पैसा काढून आशियातील बाजारात लावला आहे. गुंतवणूकदाराचा भरोसा भारत आणि आशियावर वाढला. ग्लोबल फायनान्शिअल कंडिशनचे सिटीबँकेच्या एका सविस्तर अहवालात याची माहिती देण्यात आली आहे. आशियाईतील चलन डॉलरच्या तुलनेत चांगली कामगिरी बजावत आहेत. जागतिक मंदीचे वातावरण असताना भारतीय बाजाराने चांगली कामगिरी बजावली आहे.

इतकी झाली गुंतवणूक
अमेरिकन बाजारातून मोठ्या प्रमाणात पैसा काढण्यात आला. अमेरिकेचे केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हचे आक्रमक व्याजदर धोरण जनतेच्या गळ्याशी आले आहे. तर बाजारातून अपेक्षित परतावा मिळत नसल्याने गुंतवणूकदार निराश आहेत. मार्च महिन्यात आशियातील बाजारात 5.5 अब्ज डॉलरची गुंतवणूक आली आहे. तर विकसीत देशांमधून 8.6 अब्ज डॉलरची गुंतवणूक काढण्यात आली आहे.

भारतीय बाजाराची स्थिती जोरदार
अमेरिकेच्या तुलनेत भारतीय बाजाराची स्थिती मजबूत आहे. आशियातील बाजाराच्या तुलनेत अमेरिकेन बँकिंग इंडेक्ट 10 मार्चपासून ते आतापर्यंत 10 टक्के घसरण झाली आहे. जपान सोडून इतर आशियातील देशांचा आर्थिक निर्देशांक जोरदार आहे. गुंतवणूकदारांचा आशियातील बाजारावरील विश्वास वाढला आहे. त्यांना आशियातील बाजारात नरमाईची स्थिती आहे. त्याचा फायदा गुंतवणूकदारांना होणार आहे. वैश्विक गुंतवणूकदारांना आशिया आणि भारतीय बाजारावरील भरोसा वाढला आहे. त्यांना चीन आणि भारतातील गुंतवणूक सुरक्षित आणि फायदेशीर वाटत आहे.

तीन सुरक्षित बँका
भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) नुकतीच देशातील सर्वाधिक सुरक्षित बँकांची यादी (Safest Bank in India) जाहीर केली. या बँकांमध्ये एचडीएफसी, आयसीआयसीआय आणि एसबीआय (HDFC, ICICI, SBI) यांचा समावेश आहे. या बँकांना D-SIB असे ही म्हणतात. D-SIB चा अर्थ डोमेस्टिक सिस्टमॅटिकली इंपोर्टेंट बँक असा आहे. दरवर्षी केंद्रीय रिझर्व्ह बँक देशातील सर्वात सुरक्षित बँकांची यादी जाहीर करते. या बँका बुडीत खात्यात गेल्या. त्यांनी दिवाळखोरी घोषीत केली तर देशाच्या अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडू शकते. त्यामुळे केंद्र सरकारसह आरबीआय या बँका बुडू नये यासाठी सातत्याने प्रयत्न करतात.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button