ताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचेमहाराष्ट्रराजकीयसंपादकीय

अयोध्येत भव्य महाराष्ट्र भवन उभारणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदें


महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदेंचा हा पहिलाच अयोध्या दौरा आहे.त्यामुळे या दौऱ्याकडे संपूर्ण राज्याचं लश्र लागून आहे. दरम्यान, अयोध्येत दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी पत्रकारपरिषद घेतली. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडलं. त्याचबरोबर एक मोठी घोषणा देखील केली.

एकनाथ शिंदे म्हणाले की, “शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचे अयोध्येत भव्य दिव्य राम मंदिर उभारण्याचे स्वप्न होते, जे पंतप्रधान मोदींनी पवित्र भूमीवर मंदिराचे बांधकाम सुरू करून पूर्ण केले. संपूर्ण वातावरण भगवेमय झालं आहे. राममय झाले आहे”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

“आज राममंदिराच्या उभारणीचे कामही पाहिले. सगळ्यांना वाटायचं की राम मंदिर कसं बांधणार? लोक म्हणायचे ‘मंदिर वहीं बनाएंगे, लेकिन तारीख नहीं बताएंगे? पण पीएम मोदींनी ते करून दाखवलं आणि तारीखही सांगितली. जे शंका उपस्थित करत होते, त्यांना घरी बसवलं आहे”, अशी टीका देखील मुख्यमंत्री शिंदेंनी केली.

“काही लोकांना हिंदूत्वाची अॅलर्जी”

“राममंदिर राजकारणाचा विषय अजिबात नाही. माझ्या दौऱ्याचा काही लोकांना (Maharashtra Politics) त्रास होत आहे. ते जाणून बुजून टीका करतायत. काही लोकांना हिंदूत्वाची अॅलर्जी आहे. सर्वांना सोबत घेऊन जाणारा हिंदूत्व आहे. हिंदू धर्म सर्व धर्माचा आदर शिकवतो. मोदींमुळे देशात हिंदुत्वाचा जागर मांडला गेला. काही अल्पसंतुष्ट लोक गैरसमज पसरवत आहेत. काही लोकांना हिंदुत्वाची अॅलर्जी आहे, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

“अयोध्येत भव्य महाराष्ट्र भवन उभारणार”

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी यावेळी एक मोठी घोषणा देखील केली. अयोध्येत भव्य महाराष्ट्र भवन उभारणार, असं ते म्हणाले. त्याचबरोबर उत्तर भारतीय आणि महाराष्ट्र वेगळं नाही. असंही शिंदे यावेळी म्हणाले. एकनाथ शिंदे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उत्तर प्रदेशचे मंत्री स्वतंत्र देव सिंह हेही अयोध्येत पोहोचले. देवेंद्र फडणवीस प्रार्थना करून लखनौला रवाना झाले


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button