VIDEO:सिंह बसून आराम करत होते, फिरत-फिरत दोन गेंडे आले पुढे काय झाले?

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


दोन गेंड्यांचा आणि सिंहांचा एक व्हिडीओ (Rhinoceros and lions Viral video) सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. The Figen या नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा 30 सेकंदाचा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना धक्का बसला आहे. दोन गेंडे ज्यावेळी रस्त्यातून चालत असतात. त्यावेळी जंगलचा राजा सिंह वाटेत बसलाय. गेंडे जवळ आल्यानंतर दोन सिंहानी काय केलंय हे तुम्ही व्हिडीओ (Viral Video) पाहू शकता.

 

ट्विटरच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘गेंडा पुन्हा जंगलाचा राजा आहे!’ व्हिडिओला जवळपास 7 लाख लोकांनी आतापर्यंत पाहिलं आहे. या क्लिपवर ट्विटर वापरकर्त्यांच्या प्रतिक्रियांचा महापूर उडाला. एका यूजरने लिहिले, ‘काय चालले आहे?’ दुसऱ्याने लिहिले – सिंहाला जंगलाचा राजा कोणी केले?

त्या व्हिडीओमध्ये जंगलातील दोन गेंडे ज्यावेळी रस्त्याने चालत येतात, त्यावेळी वाटेत बसलेले दोन सिंह त्यांना पाहतात. गेंडे जवळ येत असल्याचे पाहिल्यानंतर सिंह रस्त्यातून उठून उभे राहतात. परंतु तरीही गेंडे पुढे येत असल्याचे पाहिल्यानंतर सिंह पुढे सरकतात आणि पाठीमाग बघत जंगलात निघून जातात. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे.