20 रुपयांची नोट दाखवून जवळ बोलावलं, अंध आईसोबत भीक मागणाऱ्या चिमुरडीवर अत्याचार, बीड हादरलं

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

बीड: राज्यात दिवसेंदिवस भयानक घटना घडत आहेत. अनैतिक संबंधातून हत्या तसेच आत्महत्येच्या घटना घडत आहेत. बलात्कार, तसेच अत्याचाराच्याही घटना सातत्याने घडताना दिसत आहे.
त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बीड जिल्हा या घटनेने हादरला आहे. आईसोबत भीक मागणाऱ्या अवघ्या 3 वर्षांच्या मुलीवर अल्पवयीन मुलाने अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली. ही घृणास्पद घटना काल 21 फेब्रुवारीला रात्री साडेनऊ वाजता बीड शहरातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुलातील शौचालयात घडली.

या घटनेनंर मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तीन वर्षांची मुलगी आईसोबत बसस्थानक आणि परिसरात भीक मागते. पीडितेची आई अंध असून 21 फेब्रुवारीला रात्री साडेनऊ वाजता आई बेकरीसमोर बसलेली होती. यावेळी तीन वर्षांची चिमुरडी तिच्या अवतीभोवती खेळत होती.

विधिसंघर्षग्रस्त 14 वर्षीय मुलाने तिला 20 रुपयांची नोट दाखवून स्वत:जवळ बोलावले आणि त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुलाच्या मागील प्रवेशद्वारातून आत नेले. तसेच तेथे पडलेल्या एका गमछाने तिचे हात बांधले आणि त्यानंतर तिच्याशी दुष्कर्म केले. यावेळी मुलीच्या ओरडण्याच्या आवाजामुळे तिथे फिरण्यासाठी आलेल्या काही तरुणांचे लक्ष गेले असता त्यांनी तिकडे धाव घेतली. यानंतर अत्याचार करणाऱ्या मुलाने तिथून पोबारा केला.

तिच्यावर अत्याचार झाल्याचे लक्षात आल्यावर तरुणांनी संशयित मुलाचा पाठलाग केला. परंतु तो हाती लागला नाही.  भयानक दरम्यान, पीडित मुलगी यावेळी रडत आईकडे गेली. यावेळी तिच्या वस्त्रावर रक्ताचे डाग होते.

यावेळी तिने घडलेला प्रकार सांगितला. त्यावर आईने रागात तिला दोन चापटा मारल्या आणि पुन्हा प्रेमाने जवळ घेतले. त्यानंतर माय-लेकी बसस्थानकामागील स्वच्छतागृहाजवळ अंधारात विसावल्या. याठिकाणी बीड शहर पोलिसांनी त्यांचा शोध घेतला.

यानंतर मुलीवर तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले. पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरुन आरोपी मुलावर बलात्कार, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यानंतर गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, हवालदार कैलास ठोंबरे, मनोज वाघ, नसीर शेख, अशोक दुबाले, विकास वाघमारे, रामदास तांदळे, सतीश कातखडे यांनी संशयित विधिसंघर्षग्रस्त बालकाचा शोध घेतला. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.