धावत्या बसमध्येच कंडक्टरचं तरुणीसोबत धक्कादायक कृत्य

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


पुणे : (आशोक कुंभार ) पुणे शहरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुण्यात एका पीएमपीएमएलच्या बस कंडक्टरने एका तरुणीचा विनयभंग केला.

रविवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी २२ वर्षीय तरुणीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

तरुणीची तक्रार दाखल होताच, पोलिसांनी गुन्हा दाखल करत बस कंडक्टरला अटक केली आहे. विश्वनाथ (वय ४१ वर्ष) असं अटक करण्यात आलेल्या बस कंडक्टरचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून अधिकचा तपास केला जात आहे.

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी संध्याकाळी ५ ते ७ यावेळेत घडली. २२ वर्षीय पीडित तरुणी पीएमपीएमएलच्या बसने प्रवास करीत होती. दरम्यान, प्रवास करत असताना बसमधील कंडक्टर विश्वनाथ याने पीडितेसोबत अंगलगट केले.

सगळा प्रकार दाते बस स्टॉप सहकारनगर ते के.के मार्केट धनकवडी या दरम्यान घडला. ही घटना घडताच पीडित तरुणीने थेट पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि घडलेला प्रकार सांगितला. दरम्यान, पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीची पोलिसांनी तत्काळ दखल घेतली.

पोलिसांनी आरोपी कंडक्टर विश्वनाथ याला ताब्यात घेऊन रात्री उशिरा विनयभंगाच्या गुन्हा दाखल करून अटक केली. महापालिकेच्या बसमधील कंडक्टरनेच तरुणीचा विनभंग केल्याने परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे.