इगतपुरी तालुका खादी ग्रामोद्योग संघाच्या चेअरमण पदी कॉग्रेसचे वालझाड़े तर व्हा चेअरमण पदी भोपे

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


इगतपुरी तालुका खादी ग्रामोद्योग संघाच्या चेअरमण पदी कॉग्रेसचे वालझाड़े तर व्हा चेअरमण पदी भोपे

इगतपुरी तालुका खादी ग्रामोद्योग संघाची पंचवार्षिक निवडणुक सहायक निबंधक सौ अर्चना सौंदाने यांच्या अधिपत्याखाली पार पडली चेअरमणपदासाठी कॉग्रेसचे नेते बाळासाहेब वालझाड़े यांचा एकमेव अर्ज तर व्हा चेअरमण पदासाठी अनिल भोेपे यांचा एकमेव अर्ज आल्याने दोंघाचीही निवड बिनविरोध झाल्याचे निवडनुक निर्णय अधिकारी सौ सौंदाने यांनी घोषित केले याप्रसंगी वालझाड़े यांनी सलग तीन वेळा बिनविरोध चेअरमण पदाचा मान मिळवत हैट्रिक केली आहे खादी ग्रामोद्योग संघ पुनर्जीवित करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करुण संघाला नवसंजीवनी देणार असल्याचे वालझाड़े यांनी सांगीतले

यावेळी माजी आमदार शिवराम झोले, रोटरी क्लब अध्यक्ष गोरख बोडके, महाराष्ट्र प्रदेश काॅग्रेस कमेटीचे सचिव भास्करराव गुंजाळ, जेष्ठ नेते सुनिल जाधव,मा उपसभापति रघुनाथ तोकड़े यांनी त्यांचा सत्कार केला सलग तिसर्यांदा कांग्रेसने चेअरमण मिळवल्याने कॉग्रेसचा बहुमान वालझाड़े यांनी वाढवला असल्याचे कॉग्रेसचे प्रदेश सचिव गुंजाळ यांनी सांगितले याप्रसंगी संचालक भास्कर सोनवने, शिवाजी शिंदे, ज्ञानेश्वर लहमगे, माया क्षीरसागर,लहू तोकडे, भागीरथ भगत, राजेंद्र बागुल, मंदा किरवे यांच्यासह भिका शिंदे, योगेश सुरूडे रघुनाथ खातळे,धनजय म्हसने ज्ञानेश्वर तोकडे अरुण भागडे निलेश वालझाड़े आदी पदाधिकारी उपस्थित होते

या निवडीचे आमदार हिरामण खोसकर,मा आमदार निर्मला गावित मनसे नेता संदीप किर्वे,जेष्ठ नेते जनार्दन माली, उत्तमराव भोसले,रामदास धांडे, चंदू सेठ किर्वे,निवृत्ती कातोरे,किरण पागेरे, संतोष सोनवने,संतोष जगताप,प्रकाश पंडित,महिला अध्यक्षा सविता पंडित कैलास लकारे आदिनी अभिनंदन केले आहे