जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीला भेटा ! नुकतेच केले 122 व्या वर्षात पदार्पण

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


व्यस्त दिनचर्या, चुकीची आहारशैली, व्यायामाचा अभाव आणि ताणतणाव यामुळे सध्या लोक कमी वयात गंभीर आजारांना बळी पडत आहेत आणि मोठ्या संख्येने तरुणांचा मृत्यू होत आहे. अशा परिस्थितीत एका व्यक्तीच्या वयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.आंद्रेलिनो व्हिएरा दा सिल्वा नावाच्या व्यक्तीने नुकताच त्याचा 122 वा वाढदिवस साजरा केला. ज्यानंतर या व्यक्तीची सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे. हा माणूस दावा करतो की तो जगातील सर्वात वृद्ध माणूस आहे.

जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती असल्याचा दावा करणाऱ्या या ब्राझिलियन व्यक्तीने फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच आपला 122 वा वाढदिवस साजरा केला. आंद्रेलिनो व्हिएरा दा सिल्वा, जे ब्राझीलमधील गोयासमधील अपरेसिडा डी गोयानिया शहरात राहतात, त्यांच्या ओळखपत्रानुसार त्यांचा जन्म 3 फेब्रुवारी 1901 रोजी झाला असल्याचा दावा केला आहे.

या सिल्वा आजोबांना 13 नातवंडे, 16 पणतू आणि 1 खापरपणतू आहे. त्यांना सात मुले होती, त्यापैकी पाच अजूनही जिवंत आहेत. सिल्वा यांना 13 नातवंडे, 16 पणतू आणि एक पणतू आहे. या सर्वांसोबत सिल्वा यांनी त्यांचा 122 वा वाढदिवस साजरा केला आहे. तथापि, सिल्वा यांनी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपल्या वयाची पडताळणी करण्याचा प्रयत्न केलेला नाही.

सिल्वाची नात जानैना लेम्स डी सूझा हिने सांगितले की, तिचे आजोबा खूप लोकप्रिय आहेत. त्यांच्या वयामुळे लोक त्यांना ओळखतात. लोक दुरून त्यांना भेटायला येतात, त्यांच्यासोबत फोटो काढून घेतात.

विशेष म्हणजे वयाच्या 122 व्या वर्षीही सिल्वा आजोबा स्वतःची सर्व कामे स्वतः करतात. सिल्वा यांचे काही व्हिडिओ मीडियावर आले आहेत ज्यात ते पूर्णपणे फिट दिसत आहेत. काही व्हिडिओंमध्ये सिल्वा किचनमध्ये स्वयंपाक करताना दिसत आहेत. वयाच्या 122 व्या वर्षी सिल्वा आजोबांचा फिटनेस पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. त्यांच्या दीर्घायुष्याचे रहस्य त्यांचे साधे राहणीमान, माफक आहार आणि व्यायाम हे आहे.

सिल्वा आणि त्यांच्या कुटुंबाला प्रसिद्धीची पर्वा नाही आणि त्यांनी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सद्वारे जगातील सर्वात वयस्कर व्यक्ती म्हणून स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला नाही.

विशेष म्हणजे, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनुसार, जगातील सर्वात वृद्ध जिवंत व्यक्ती स्पेनची मारिया ब्रान्यास ही आहे. 17 जानेवारी 2023 पर्यंत त्यांचे वय 115 वर्षे 319 दिवस असल्याची नोंद करण्यात आली आहे. 4 मार्च 1907 रोजी जन्मलेल्या मारिया ब्रान्यास सध्या कॅटालोनियातील एका नर्सिंग होममध्ये राहतात. त्यांनी आपल्या दीर्घायुष्याचे श्रेय सुव्यवस्थित आणि संयमी जीवन तसेच सामाजिकदृष्ट्या आनंदी राहण्याला दिले. अतिरेकाशिवाय चांगले जीवन शक्य आहे, असा त्यांचा विश्वास आहे.