क्राईम

आजारी सासूला भेटायला गेला, मेव्हण्याने जावयाचा काटाच काढला; काय घडलं असं ?


सासूला भेटायला गेलेल्या जावयाची त्याच्या मेव्हण्याने ( पत्नीचा भाऊ) हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडली. आई खूप दिवसांपासून आजारी असल्याने पत्नीने तिला भेटायला जायचा हट्ट केला. 

तेव्हा नवऱ्याने आधी नकारच दिला. पण तिने काहीच ऐकलं नाही, अखेर नवरा तिच्या पत्नीसह सासरी पोहोचला. मात्र तिथे गेल्यावर त्याच्या मेव्हण्याने त्याच्याशी भांडण सुरू केला आणि रागाच्या भरात त्याने जावयाच्या शरीरात चाकू खुपसला आणि त्याचा जीवच गेला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला असून गावात दहशतीचं वातावरण आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, ही धक्कादायक घटना बरेलीच्या बारादरी ठाणे क्षेत्रातील आहे. हाजियापूरचा रहिवासी झाकीर खान याने 2005 मध्ये बेबीशी लग्न केले. मात्र त्यांच्या प्रेमविवाहामुळे बेबीचे कुटुंब खूप नाराज होते. हळूहळू दिवस आणि वर्षे सरत गेली. बेबी आणि झाकीरच्या लग्नाला 19 वर्षे पूर्ण झाली, ते आनंदात राहत होते. पण, अचानक झाकीरच्या सासूची म्हणजेच बेबीच्या आईची तब्येत बिघडली.

 

सासूची विचारपूस करण्यासाठी गेला आणि…

 

आपल्या आईची तब्येत बरी नाही हे समजताच बेबीला चिंता वाटू लागली. रविवारी दुपारी बेबीने झाकीरला तिच्या आजारी आईला भेटायला जाण्याचा हट्ट धरला. यावेळी झाकीरने सासरी जाण्यास स्पष्ट नकार दिला. पण बेबी आग्रह करत राहिली आणि शेवटी तो सोबत जायला तयार झाला. झाकीर जेव्हा त्याच्या पत्नीसबोत, बेबी हिच्यासोबत सासरी पोहोचला तेव्हा त्याचा मेहुणा शाहिदही तिथे उपस्थित होता. शाहिदने अचानक झाकीरशी भांडण सुरू केले.

शरीरात चाकू खुपसून केली हत्या

बघता बघता त्यांचं भांडण वाढलं आणि मारामारी सुरू झाली. अचानक शाहिदने झाकीरवर चाकू उगारला आणि त्याच्यावर वार करण्यासाठी धावला. झाकीर स्वतःचा बचाव करत राहिला पण शाहिदने त्याच्या छातीत चाकू घुसवला. झाकीरने स्वत:ला वाचवण्यासाठी चाकू पकडण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा हातही कापला गेला. चाकूने जखमी झालेल्या झाकीरचा जागीच मृत्यू झाला. यानंतर आरोपी शाहिद घटनास्थळावरून फरार झाला. पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. आरोपीचा शोध सुरू असून, त्याला लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितलं.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button