मनोरंजन

‘त्या’ 3 विधी. ज्यानंतर एक सामान्य मुलगी होते ‘वेश्या’, सर्वत्र विधींची चर्चा


संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘हीरामंडी’ वेब सीरिज प्रजर्शित झाली. सीरिजनंतर लोकांच्या मनात देहविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या आयुष्याबद्दल अनेक चर्चा रंगू लागल्या. पूर्वी लाहोर याठिकाणी असलेल्या हीरामंडी याठिकाणी कसं वातावरण होतं.तेथील महिला कसं आयुष्य जगत होत्या. इत्यादी गोष्टींची चर्चा सध्या तुफान रंगली आहे. अशात आज जाणून घेऊ सामान्य मुली कोणत्या विधी पूर्ण करत वेश्या होतात.

पहिली विधी असते ती म्हणजे अंगिया…मुलगी जेव्हा तरुणवयात पदार्पण करते तेव्हा अंगिया विधी संपन्न होते. तरुण वयात आल्यानंतर मुलींच्या शरीरात अनेक बदल होत असतात. जेव्हा मुलीला अंगिया घातली जाते. अंगिया म्हणजे ब्रा… तेव्हा ब्रासाठी अंगिया या शब्दाचा वापर केला जायचा…

दुसऱ्या विधीबद्दल सांगायचं झालं तर, दुसऱ्या विधीमध्ये दात – हिरड्यांना आर्यल आणि कॉपर सल्फेट लावून काळ्या केल्या जायच्या. त्या काळात काळे पडलेले दात शुभ मानले जायचे. रिपोर्टनुसार, कोठ्यातील सर्वात वरिष्ठ महिला इतर मुलींच्या विधी पार पाडायची.. तिसरी आणि शेवटची विधी म्हणजे नथ उतराई…

नथ उतराई विधी झाल्यानंतर सामान्य आयुष्य जगत असलेली मुलगी वेश्या व्यवसायाला सुरुवात करायची. नथ उतराईनंतर पहिलांदा मुलीवर बोली लावली जायची… यासाठी अनेक श्रीमंत व्यक्ती नश उतराई विधीसाठी उपस्थित असायचे. जो सर्वात जास्त बोली लावेल त्या व्यक्तीसोबत मुलगी असायची. ज्यासाठी श्रीमंत व्यक्ती मोठी रक्कम मोजायचे.

नथ उतराई विधीच्या वेळी मुलीला नव्या नवरीप्रमाणे सजवलं जायचं… त्या रात्रीनंतर मुलगी कधीच नथ घालत नव्हती… ‘हीरामंडी’ सीरिजमध्ये देखील अनेदा ‘नथ उतराई’ शब्दाचा उल्लेख झाला आहे. सीरिजमध्ये अभिनेत्री शरमीन सेहगल हिच्या नश उतराईसाठी अभिनेत्री मनिषा कोईराला तयारीत असल्याचं दाखवण्यात आलं आहे.

‘हीरामंडी’ सीरिजमध्ये अभिनेत्री शरमीन सेहगल हिने आलमझेब भूमिका साकारली आहे तर, मनिषा कोईराला हिने मल्लिकाजान भूमिकेला न्याय दिला. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘हीरामंडी’ सीरिजची चर्चा रंगली आहे. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या सीरिजला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button