क्राईम

चालत्या बसमध्ये 14 वर्षीय मुलीवर दोनदा बलात्कार; थांगपत्ताही लागला नाही


चालत्या बसमध्ये 14 वर्षीय मुलीवर बलात्काराची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीने स्लीपर कोच बसमध्ये या मुलीवर अत्याचार केले. राजस्थानच्या चुरू जिल्ह्यातल्या रतननगर भागात हा खळबळजनक प्रकार घडला आहे. 

या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला 24 तासात अटक केली आहे, यानंतर त्याला कोर्टात हजर केलं गेलं. कोर्टात आरोपीला दोन दिवसांची पोलीस कस्टडी देण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस आता आरोपीची चौकशी करत आहेत. तसंच पीडित मुलीचा जबाब नोंदवण्यात आला आहे. तसंच पीडित मुलीची वैद्यकीय चाचणीही घेण्यात आली आहे.

 

या प्रकरणातला आरोपी अनिल मेघवाल हा 21 वर्षीय तरुण ढाढरिया बनिरोतान गावाचा रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपी अनिल मेघवालने अडीच वर्षांपूर्वी गावातल्या धर्मशाळेत अल्पवयीन मुलीला नशेचा पदार्थ खायला देऊन तिच्यावर अत्याचार केले होते. यादरम्यान आरोपीने पीडित मुलीचे अश्लिल फोटो काढले होते, तसंच तो या फोटोंच्या माध्यमातून पीडित मुलीला ब्लॅकमेलही करत होता.

 

आरोपीने 28 एप्रिलला दुकानात चाललेल्या अल्पवयीन मुलीला थांबवलं आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. यानंतर त्याने मुलीचं अपहरण केलं. अपहरण केल्यानंतर अनिल पीडित मुलीला घेऊन सरदारशहरपासून जैसलमेरला जाणाऱ्या स्लीपर बसमध्ये बसला. त्याने चालत्या बसमध्ये 14 वर्षीय विद्यार्थिनीवर दोन वेळा बलात्कार केला. याप्रकरणी पीडित मुलीने एक दिवस आधीच तक्रार दाखल केली होती.

 

पोलिसांनी पीडित मुलीच्या तक्रारीवरून आरोपी अनिल मेघवालविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यानंतर त्याला अटकही करण्यात आली आहे. कोर्टात नेल्यानंतर त्याला दोन दिवसांची पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीनंतरही गुन्हा दाखल केला नव्हता. अखेर पीडित मुलगी तिच्या वडिलांसोबत एसपी ऑफिसला गेली आणि तिने न्याय मागितला, यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button