क्राईम

बहिणीच्या घरी सडतो म्हणून गोव्यात घेऊन गेले;नातेवाईकांनीच आठवडाभर केला सामूहिक अत्याचार


छत्तीसगडमधील अंबिकापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बहिणीच्या घरी सडतो असे म्हणून गोव्यात घेऊन जात नातेवाईकांनीच महिलेवर तिच्यावर सामूहिक अत्याचार केला.सुमारे आठवडाभर महिलेवर अत्याचार करण्यात आल्याचे तक्रारीतून समोर आले आहे.

बदनामीच्या भीती आणि दिलेल्या धमकीमुळे घाबरलेली महिला आठवडाभर गप्प होती, अखेर कुटुंबीयांच्या मदतीने तिने तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.

अंबिकापूरमधील गांधी नगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेने पाच मे रोजी एक रोजी सामूहिक बलात्कार झाल्याची तक्रार दाखल केली.

पीडित अजिर्मा गावात वसतिगृहात राहते. 15 जानेवारीला ती तिच्या बहिणीच्या घरी जाण्यासाठी वसतिगृहातून बाहेर पडली. दरम्यान काही अंतरावर तिचे नातेवाईक शुभम आणि अंशू तिला भेटले.

बहिणीच्या घरी सोडतो असे त्यांनी सांगितले. गाडीत बसले त्यात त्यांचे आणखी दोन मित्र होते. फसवणूक करुन ते महिलेला गोव्यात घेऊन गेले. गोव्यात वेगवेगळ्या ठिकाणी आठवडाभर सामूहिक अत्याचार केल्याचा आरोप महिलेने तक्रारीतून केला आहे.

गोव्यातून आल्यावर त्यांनी महिलेला बहिणीच्या घरी सोडले. दरम्यान, घडलेल्या घटनेबाबत कोणाशीही बोलू नकोस अशी, धमकी त्यांनी दिली.

महिलेला सारखी शांत बसू लागल्याने काय झालं असे कुटुंबीयांनी विचारले, मात्र ती टाळाटाळ करु लागली. अखरे विश्वासात घेतल्यानंतर तिने घडलेल्या प्रसंगाची माहिती दिली.

पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी संशयित आरोपी शुभम, अंशू, पुष्पराज आणि संजय यांच्याविरुद्ध सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करत तिघांना अटक केली आहे. आणखी एका आरोपीचा शोध सुरु आहे. पोलिसांनी या घटनेत वापरलेली कार आणि तीन दुचाकी देखील जप्त केल्या आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button