सख्ख्या भावाने केली बहिणीची हत्या; रक्ताने दोन नावं लिहिली

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


कोल्हापूरः सख्ख्या भावने बहिणीची कोयत्याने हत्या केल्यााच प्रकार उघड झाला असून घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

रक्ताने माखलेला कोयता घेऊन एक तरुण रस्त्याने फिरत होता. पोलिसांना ही माहिती मिळाल्यानंतर त्याला तातडीने ताब्यात घेण्यात आलेलं आहे. त्याच तरुणाच्या सांगण्यानुसार त्याने सख्ख्या बहिणीचा खून केला.

या घटनेने पोलिस प्रशासन खडबडून जागं झालं आहे. पोलिसांना अद्याप तरुणीचा मृतदेह मिळालेला नाही. बहिणीचा खून केल्यानंतर तरुणाने पोत्यावर रक्ताने गीता-प्रताप असं लिहिल्याचं सांगितलं जात आहे.

पोलिस सध्या सदर तरुणाची कसून चौकशी करीत आहेत. हा तरुण नशेत असल्याचं सांगण्यात येतंय. पोलिस तरुणीच्या मृतदेहाचा शोध घेत असून भावाने पोत्यावर लिहिलेल्या गीता-प्रताप नावाचा उलगडा पोलिस करीत आहेत.