जनरल नॉलेज

14 व्या वर्षी लग्न, 18 व्या वर्षी दोन मुलांची आई; नंतर IPS बनून रचला इतिहास


“मला ही फुलं वारसाहक्काने मिळाली आहेत, तुम्ही माझा काट्यांनी भरलेला बिछाना पाहिला नाही” बशीर बद्र साहेबांची ही ओळ आयपीएस एन अंबिका (IPS N Ambika) यांच्यावर अगदी फिट बसते.



काही लोक आपल्या जीवनात चांगली भरारी घेऊन अनेकांच्या समोर उदाहरण उभं करतात. आयपीएस अंबिका यांची जीवनगाथा देखील त्यापैकीच एक आहे. अंबिका यांची यशोगाथा केवळ तरुणांना पुढे जाण्यासाठी प्रेरणा देत नाही तर जीवनात कितीही अडचणी आल्या तरी ध्येयापासून मागे हटू नका हे देखील दाखवते.

आयपीएस अंबिका मुंबईची लेडी सिंघम म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र, आयुष्याच्या या टप्प्यावर पोहोचणे हे अंबिका यांच्यासाठी खूप कठीण होते. अवघ्या 14 व्या वर्षी त्या बालविवाहाच्या शिकार झाल्या. लग्नानंतर काही काळानंतर तिने एका मुलाला जन्म दिला. त्या 18 वर्षांच्या असताना दोन मुलांची आई झाल्या. त्यांचे पती पोलिसात हवालदार म्हणून कार्यरत होते. हसतमुख कुटुंबात सर्व काही ठीक चालले होते. पण एका घटनेने त्यांना आयपीएस व्हायला भाग पाडले. याबाबत त्यांनी जेव्हा घरच्यांना सांगितले त्यावेळी सर्वांना धक्काच बसला.

IPS N Ambika Success Story: या घटनेने आयुष्य बदलले

एका मुलाखतीदरम्यान अंबिका यांनी सांगितले होते की, एकदा त्या आपल्या दोन मुलांसोबत प्रजासत्ताक दिनानिमित्त परेड पाहण्यासाठी गेल्या होत्या. येथे त्यांनी आपल्या पतीला काही अधिकाऱ्यांना सॅल्युट करताना पाहिले. अंबिका यांनी आपल्या पतीला विचारले की, तुम्ही कोणाला सॅल्युट करत होता. त्यांनी सांगितले की, ते एक आयपीएस अधिकारी आहेत. अंबिका यांच्या मनाला ही गोष्ट स्पर्शून गेली आणि त्यांनी ठरवले की आता त्यांनाही आयपीएस अधिकारी व्हायचे आहे. जेव्हा अंबिका यांनी त्यांच्या पतीला आयपीएस अधिकारी होण्याचे स्वप्न सांगितले तेव्हा ते हसले आणि कुटुंबातील लोकही हसले. पण अंबिका यांची तळमळ पाहून त्यांचे पती त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी नेहमीच त्यांच्या पाठीशी उभे राहिले.

UPSC Success Story: 10 वी नंतर पदवीपर्यंतचे शिक्षण डिस्टन्स लर्निंगद्वारे घेतले

लग्नानंतर अंबिका यांनी शिक्षण सोडले होते. त्या गृहीणी होत्या. अशा परिस्थितीत अंबिका यांनी प्रथम एका कोचिंग सेंटरमध्ये प्रवेश घेतला आणि त्या दहावीची परीक्षा डिस्टंन्स लर्निंगद्वारे पास झाल्या. यानंतर त्यांनी डिस्टंन्स लर्निंगद्वारे पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. पण आता अडचण अशी होती की, अंबिका यांच्या घराजवळ UPSC कोचिंग सेंटर नव्हते. अशा परिस्थितीत नागरी सेवा परीक्षेची तयारी करण्यासाठी अंबिका या पती आणि मुलांसह चेन्नईला शिफ्ट झाल्या. यामध्ये त्यांच्या कुटुंबीयांनीही त्यांना साथ दिली. अंबिका जेव्हा कोचिंगला जायच्या तेव्हा त्यांचे पती घरीच राहायचे आणि दोन्ही मुलांचा सांभाळ करायचे.

UPSC Success Story: हार न मानता चौथ्या प्रयत्नात यश

अंबिका यांच्यासाठी हे सर्व सोपे नव्हते. अंबिका यांना सलग तीन वेळा यूपीएससी परीक्षेत अपयश आले होते. पण अंबिका यांनी हार न मानता मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी चौथ्या प्रयत्नात विजय मिळवला. 2008 मध्ये, त्यांनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आणि आयपीएस अधिकारी बनल्या. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना महाराष्ट्रात पहिली पोस्टिंग मिळाली. त्यांनी नागरी सेवा परीक्षेची तयारी करण्याचे ठरवले, ज्यामध्ये त्यांच्या पतीने त्यांना पूर्ण पाठिंबा दिला. आयपीएस एन अंबिका यांची ही कहाणी यूपीएससीची तयारी करणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button