अश्लील व्हिडीओ दाखवून पती.. पत्नी वैतागली अन् केली तक्रार.. आता जेलमध्ये..

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


इंदूर : शहरात महिलांशी संबंधित गुन्ह्यांचा आलेख सातत्याने वाढत आहे. नुकतेच एका महिलेच्या तक्रारीवरून आझाद नगर पोलिसांनी तिच्या पतीविरुद्ध अनैसर्गिक कृत्यांसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच आरोपी पसार झाला. तपासानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

पीडितेने तिच्या पतीविरुद्ध अनैसर्गिक कृत्यांसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. यासोबतच आरोपी पती अश्लील फिल्म दाखवून तिच्याशी वेगवेगळ्या प्रकारे शारीरिक संबंध बनवतो, असे पीडितेने पोलिसांना सांगितले होते. विरोध केला तर मारहाण करायचा. या सर्व गोष्टींमुळे व्यथित झालेल्या तिने पतीला अनेकदा सल्ला दिला, पण तो ऐकायला तयार नव्हता.

पीडितेच्या तक्रारीनंतर आझाद नगर पोलिसांनी आरोपीविरुद्ध हुंड्याची मागणी, अनैसर्गिक कृत्य आणि इतर कलमांनुसार गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी पोलिसांनी काही दिवस पसार झालेल्या आरोपीला आठ दिवसांनंतर अटक केली. आरोपी फैजल हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याच्यावर 307 सह इतर कलमान्वये यापूर्वीच गुन्हे दाखल आहेत. फैजलने पत्नीला वेगवेगळ्या प्रकारे त्रास देण्यास सुरुवात केल्यावर पत्नी फैजलला सोडून माहेरी गेली. यादरम्यान फैजल हा घराच्या शेजारी राहणाऱ्या मुलीसोबत पळून गेला होता. ज्या मुलीसोबत तो पळून गेला होता त्या मुलीचे लग्न गुजरातमध्ये होणार होते.