ताज्या बातम्या

विधानसभा पोटनिवडणुकीवरुन आघाडीत बिघाडी, काँग्रेसचा झाला निर्णय?


काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने भाजपविरोधात निवडणूक लढवण्याची भूमिका घेतली आहे. त्याचवेळी पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादीच्या जागेवर दावा करत काँग्रेसही निवडणूक लढवण्यावर ठाम आहे. यामुळे आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.



पिंपरी चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी सुरू करा, असे आदेश पदाधिकाऱ्यांना दिले होते. त्यावरून पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष कैलास कदम यांनी शनिवारी बैठक घेतली. या बैठकीत काँग्रेसकडून इच्छुक असलेल्या उमेदवारांनी देखील सहभाग घेतला. त्यांना अर्ज सादर करण्याचे सांगितले आहे.
काँग्रेसचे शहराध्यक्ष रणजित जाधव म्हणाले की, महाविकास आघाडी असली तरी आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत. दोन दिवसांत उमेदवारांचे अर्ज माझ्याकडे दाखल होणार आहे. त्याचा अहवाल पक्षश्रेष्ठींना पाठवून निर्णय घेण्यात येणार आहे.

कसबा मतदार संघावर गेली तीन दशके भाजपचे वर्चस्व आहे. मुक्ता टिळक (mukta tilak) यांच्या निधनामुळे या मतदार संघात २७ फेब्रवारी रोजी निवडणूक होत आहे. भाजप टिळक परिवाराला उमेदवारी देणार का? चंद्रकांत पाटील यांच्यासाठी कोथरुड मतदार संघ सोडणाऱ्या मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी देणार? हा निर्णय अजून झालेला नाही. परंतु टिळक परिवारात उमेदवारी देण्यात येणार असल्याचे भाजप सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

एक-दोन दिवसात भाजप नेते देवेंद्र फडणवीस भाजप उमेदवाराच्या नावाची घोषणा करणार आहे. कोथरुडमध्ये उमेदवारी नाकारल्यामुळे नाराज असलेल्या मेधा कुलकर्णी यांची नाराजी कायमच राहणार असल्याचे चित्र सध्या दिसून येत नाही. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून रूपाली पाटील-ठोंबरे हे इच्छुक आहेत. त्यांनी जाहीरपणे आपली इच्छा बोलून दाखवली. पक्षाने आदेश दिल्यास मीसुद्धा कसबा मतदार संघाची निवडणूक लढवण्यास तयार आहे. यामुळे पिंपरी चिंचवड व कसबा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता नाही.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button