ताज्या बातम्याबीड

बीड टॅंकरने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघेजण जागीच ठार


दुचाकीवरून जाणाऱ्या अनिल तरटे यांना टँकरने जोराची धडक दिली. डोईठाण परिसरात शिवनेरी चौकात ही घटना घडली. डिझेलचा टँकर अहमदनगरच्या दिशेने जात होता. तेव्हा दुचाकीला धडक दिली. यात अनिल तरटे यांच्यासह महादेव गायकवाड यांचा मृत्यू झाला.

बीड : आष्टी तालुक्यातील डोईठाण येथील मुख्य चौकात एका टॅंकरने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघेजण जागीच ठार झाल्याची घटना घडली. महादेव गायकवाड व अनिल तरटे असे अपघातात ठार झालेल्या दोघांची नावे आहेत.

महादेव गायकवाड हे कडा येथून त्यांच्या गावी निघाले होते. यादरम्यान धामणगाव येथून अनिल तरटे यांनी त्यांना लिफ्ट मागितली. येथील चौकात येताच त्या ठिकाणी टँकर त्यांना धडक दिली. यात दोघे जागीच ठार झाले.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, पाटोदा तालुक्यातील सकुंडवाडी इथं राहणारे महादेव गायकवाड हे कामावरून परत येत होते. ते धामनगाव मार्गे गावी जात होते. दुचाकीवरून जाणाऱ्या अनिल तरटे यांना टँकरने जोराची धडक दिली. डोईठाण परिसरात शिवनेरी चौकात ही घटना घडली. डिझेलचा टँकर अहमदनगरच्या दिशेने जात होता. तेव्हा दुचाकीला धडक दिली. यात अनिल तरटे यांच्यासह महादेव गायकवाड यांचा मृत्यू झाला.

अपघातानंतर टँकर चालक घटनास्थळावरून फरार झाला होता. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत टँकर ताब्यात घेतले. अपघातामुळे घटनास्थळी बघ्यांनी गर्दी केली होती. यामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.




Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


Back to top button