गावी जात असताना चालकाचा वळणावर अचानक ताबा सुटल्याने सुरक्षेसाठी लावलेला लोखंडी रेलिंग थेट कारमध्ये घुसला. यात एकाच कुटुंबातील चारजण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास पिंपरीघाट परिसरात झाला.
बीड :(कडा )बीड-धामणगांव-नगर राज्य महामार्गावरून नांदेड येथे आई-वडिल, मुलगा आणि सून जात कारमधून ( एम.एच २९,ए.आर. २५९६) जात होते. आष्टी तालुक्यातील पिंपरीघाट येथील कानिफनाथ डोंगराच्या वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने कार रस्त्याच्या बाजूच्या सुरक्षा कठड्यावर आदळली. जोरदार धडकेने लोखंडी रेलिंग थेट कारमध्ये घुसली