डॉ. अजय दादा धोंडे यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद सिनेट सदस्यपदी निवड

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


डॉ. अजय दादा धोंडे यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद सिनेट सदस्यपदी निवड झाल्याबद्दल आनंद शैक्षणिक संकुल मधील सर्व महाविद्यालयाच्या वतीने अभिनंदन करुन सत्कार संपन्न

आष्टी : भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा बीड जिल्हा सरचिटणीस डॉ. अजय दादा धोंडे यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद सिनेट सदस्यपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करुन आनंद शैक्षणिक संकुल मधील सर्व महाविद्यालयाच्या वतीने छत्रपती शाहू फुले आंबेडकर कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात सत्कार करण्यात आला . यावेळी प्रशासन अधिकारी डॉ. डि. बी‌ राऊत, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. आर. आरसुळ, डी फार्मसी व बी फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुनील कोल्हे, इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य संजय बोडखे, महेश आयुर्वेद महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत गोसावी, फुड कॉलेज चे प्राचार्य साईनाथ मोहळकर व आनंद शैक्षणिक संकुल मधील सर्व कॉलेजचे प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.मिसाळ एल. एस. यांनी केले तर आभार प्रा. काळे पी. आर. यांनी मानले.