ताज्या बातम्याबीडमहत्वाचेमहाराष्ट्रराजकीय

भीषण अपघात; माजलगावच्या माजी आमदारांच्या नातवाचा जागीच मृत्यू


माजलगाव : येथील माजी आमदार बाजीराव जगताप यांचा नातू व छत्रपती कारखान्याचे व्हाईस चेअरमन मोहन जगताप यांचा पुतण्या विश्वजीत जीवन जगताप ( 21 ) याचा औरंगाबादहून माजलगावला काम आटोपून परत येत असताना शुक्रवारी रात्री १२ वाजेच्या दरम्यान गेवराईजवळ अपघात होऊन जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.
माजलगाव येथील छत्रपती सहकारी कारखान्याचे संचालक तथा छत्रपती नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन जीवनराव जगताप यांचे चिरंजीव विश्वजीत जगताप व त्याचा मित्र आर्यन कंटुले हे काही कामानिमित्त औरंगाबादला गेले होते. काम आटोपून माजलगावकडे चारचाकीतून ( एम.एच. 44, टी. 5152) येत होते. दरम्यान, रात्री बारा वाजेच्या दरम्यान गेवराई जवळ समोरून येणाऱ्या कॅन्टरने कारला धडक दिली.यात डोक्याला जबर मार लागल्याने विश्वजितचा जागीच मृत्यू झाला. आर्यन कंटुले हा सीट बेल्ट लावलेला असल्याने सुदैवाने वाचला. विश्वजीत हा जिवन जगताप यांचा एकुलता एक मुलगा होता. यांच्या पश्चात आई-वडील, दोन बहिणी असा परिवार आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button