पुण्यात येऊन बृजभूषण सिंह यांचे राज ठाकरेंवर वक्तव्य! काय म्हणाले?

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे उत्तर प्रदेशातील भाजप खासदार बृजभूषण सिंह हे पुण्यात आले आहेत. पुण्यात आयोजित महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात ते उपस्थित राहणार आहेत.
खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंनी त्यांच्या दौऱ्याला विरोध न केल्याबद्दल आभारही मानले आहेत. (Brijbhushan Singh on Raj Thackeray)

महाराष्ट्रात आले तर राज ठाकरे यांना भेटणार का?, असा प्रश्न बृजभूषण सिंह यांना विचारण्यात आला. यावर बृजभूषण सिंह म्हणाले राज ठाकरे मंचावर आले तर आम्ही त्यांना नक्की भेटणार. त्यांच्याशी काही वयैक्तिक वैर नाही. ते आले तर त्यांची चांगली भेट घेऊ.
बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांना अयोध्येत यायला विरोध केला होता. मात्र राज ठाकरेंनी त्यांना महाराष्ट्रात येण्यावर विरोध केला नाही. यावर देखील बृजभूषण यांनी भूमिका स्पष्ट केली.

बृजभूषण सिंह म्हणाले, “कधीकाळी महाराष्ट्रात उत्तर प्रदेशातील नागरिकांना त्रास झाला होता. यावर राज ठाकरे यांनी माफी मागावी, अशी मागणी मी केली होती. मी म्हणालो होतो राज ठाकरे यांना देखील माहित नसेल त्यांच्या कार्यकर्त्यांकडून आमच्या नागरिकांना त्रास झाला असेल. पण आता ती गोष्ट संपली, दिवसे गेले.”