पोलीस ठाण्यावर आक्रमण : एक पोलीस ठार

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


  • पोलिओ लसीकरण पथकाला संरक्षण देणार्‍या पोलिसांवर आक्रमण

ईस्लामाबाद : पाकच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील लक्की मारवात जिल्ह्यातील वारगडा पोलीस ठाण्यावर अज्ञाताने केलेल्या गोळीबारात १ पोलीस ठार, तर अन्य १ पोलीस घायाळ झाला. या वेळी पोलिसांनीही प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला.

डेरा इस्माइल खान जिल्ह्यातील एका घटनेत पोलिओ लसीकरणाच्या कर्मचार्‍यांना संरक्षण देणार्‍या पोलिसांच्या पथकावर अज्ञातांनी आक्रमण केले. यात ५ पोलीस घायाळ झाले. या वेळी बाँबही फेकण्यात आला होता. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात एक आक्रमणकर्ता घायाळ झाला. त्याला घेऊन आक्रमणकर्ते पसार झाले. आक्रमण करणारे आतंकवादी असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. येथे पोलिओ लसीकरणाचा विरोध केला जात आहे. यापूर्वी लसीकरण करणारे पथक आणि त्यांना संरक्षण देणारे पोलीस यांच्यावर अनेकदा आक्रमणे झालेली आहेत.