ताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचेमहाराष्ट्रशेत-शिवार

कापूस दर 9,600 रुपयांवर ; कापूस उत्पादक आनंदात


कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी थोडीशी दिलासादायक बातमी समोर येत आहे. खरं पाहता गेल्या काही दिवसांपासून कापूस दर दबावत आले आहेत. काल झालेल्या लिलावात कापूस दर नरमलेलेच होते.यामुळे कापूस उत्पादक शेतकरी बांधवांनी कापसाची विक्री थांबवली असून दरवाढीच्या आशेने कापसाची साठवणूक सुरू केली आहे. गेल्यावर्षी कापसाला बारा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा विक्रमी दर मिळाला असल्याने या वर्षी देखील शेतकऱ्यांना कापसाच्या बाजारभावात मोठी वाढ होण्याची अशी आहे.

दरम्यान मानवत कृषी उत्पन्न बाजार समिती मधून गेल्या चार ते पाच दिवसांपासून शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर येत. मानवत एपीएमसी मध्ये गेले चार ते पाच दिवस कापूस दर तेजीत आहेत. एका मीडिया रिपोर्ट मध्ये दिलेल्या बहुमूल्य माहितीनुसार, मानवत एपीएमसी मध्ये गेल्या चार दिवसात कापसाला 9 हजार रुपये प्रतिक्विंटल ते नऊ हजार सहाशे रुपये प्रतिक्विंटल पर्यंतचा दर मिळाला आहे.

निश्चितच मानवत एपीएमसी मध्ये कापूस दर तेजीत आहेत. मात्र राज्यातील इतर प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापूस दर 9000 रुपये प्रति क्विंटल च्या खाली आले आहेत. दरम्यान जाणकार लोकांच्या मते जानेवारी महिन्यापर्यंत कापसातील चढ-उतार सुरू राहणार आहे. पण जानेवारी महिन्यानंतर कापूस दरातील चढ-उतार थांबणार असून कापसाला 9000 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा सरासरी बाजार भाव मिळणार आहे.

निश्चितच शेतकरी बांधवांना 9 हजार रुपये प्रति क्विंटल एवढा बाजार भाव नसून 12 हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतच्या बाजार भावाची आशा आहे. गेल्या वर्षी कापूस बारा हजार रुपये प्रति क्विंटल दराने विक्री केला असल्याने या वर्षी देखील असाच बाजार भाव शेतकऱ्यांना अपेक्षित असल्याने त्यांनी कापसाची साठवणूक सुरू केली आहे.

दरम्यान मानवत एपीएमसी वगळता इतरत्र कापूस दर पुन्हा एकदा दबावात आले आहेत. यामुळे शेतकरी बांधवांनी 9000 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी दर कापसाला मिळेल हे ध्यानात ठेवून कापसाची टप्प्याटप्प्याने विक्री करत राहणे शेतकऱ्यांसाठी फायद्याचे ठरणार आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button