राष्ट्रवादी काँग्रेसचा बडा नेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

कोल्हापूर, 25 नोव्हेंबर : राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्रामध्येच त्यांना धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा बडा नेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत व्यासपीठावर दिसला आहे.
श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान वतीने आयोजित सुमंगलम पंचभौतिक महोत्सवाच्या बोधचिन्ह अनावरणाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापुरात आले होते. या कार्यक्रमात शिंदेंसोबत व्यासपीठावर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक ए.वाय.पाटील होते. ए.वाय.पाटील हे मागच्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. एकेकाळी कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा दबदबा होता.

शरद पवारांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात सध्या राष्ट्रवादीला घरघर लागल्याचे दिसून येत आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी राष्ट्रवादीला सोडचिट्टी दिल्यानंतर राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला होता. यानंतर आता ए.वाय. पाटील शिंदेंसोबत दिसले आहेत.

श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान वतीने आयोजित सुमंगलम पंचभौतिक महोत्सव २२ते२६ फेब्रु.२०२३ दरम्यान कण्हेरी मठ,कोल्हापूर येथे होणार आहे.या महोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरण कार्यक्रमाचा शुभारंभ सोहळा संपन्न झाला. प्रारंभी पंचगंगा नदीची आरती झाल्यानंतर बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले.