‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’ दोन गोण्या चिल्लर घेऊन पोहोचले अन…

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


एक आणि 5 डिसेंबरला दोन टप्प्यात गुजरात राज्यात विधानसभेसाठी मतदान करण्यात येईल तर 8 डिसेंबरला मतमोजणी होईल. गांधीनगर उत्तर भागातील मतदानप्रक्रिया दुसऱ्या टप्प्यात 5 डिसेंबर रोजी पार पडणार आहे.

गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान 1 डिसेंबर 2022 रोजी पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी 14 नोव्हेंबर ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती.
ही तारीख उलटून गेल्यानंतर आता एका अपक्ष उमदेवाराची चर्चा रंगली आहे. ‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’ या प्रचंड गाजलेल्या मराठी चित्रपटामध्ये घडलेल्या प्रसंगाची त्याच्याशी तुलना केली जात आहे.

‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’ या चित्रपटात मकरंद अनासपुरे यांनी नारायण वाघ या इच्छुक उमेदवाराचे पात्र साकारले होते. यात ते उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटच्या दिवशी चिल्लर घेऊन जातात. ही रक्कम मोजताना अधिकाऱ्यांना अक्षरशः घाम फुटलेला दिसत होता. असाच काहीसा प्रकार गुजरातमधील गांधीनगर भागातील पाटनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयात घडला आहे.

राजधानी गांधीनगर येथील 35 वर्षीय महेंद्रभाई पाटनी यांनी गांधीनगर उत्तर भागातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पाटनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयात ते 10 हजार रुपयांचे नामांकन शुल्क भरण्यासाठी दोन गोण्या चिल्लर घेऊन पोहोचले. राजधानीतील परिस्थितीमुळे ते समाधानी नाहीत, त्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत येथील चेहरामोहरा बदलण्याचा विडा उचलला आहे.
चिल्लरच्या रुपाने डिपॉझिट भरण्यामागील कारण विचारले असता महेंद्रभाई पाटनी यांनी सांगितले की, मी मजुरी करतो. माझ्याकडे स्वत:चे घर नाही, पिण्यासाठी पाणी नाही आणि वीजही नाही. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मला आजूबाजूच्या लोकांनी समर्थनही दिले आहे. उमेदवारी अर्ज भरताना दाखल करण्यासाठी आवश्यक डिपॉझिट भरण्यासाठीचे पैसेही माझ्याकडे नव्हते. तीन दिवस मी लोकांकडे चिल्लर गोळा करून हे पैसे भरले आहेत.

महेंद्रभाई पाटनी यांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जामध्ये त्यांच्या नावावर शून्य संपत्ती असल्याचे नमूद आहे. तसेच निवडणूक लढवण्यासाठी बँक खाते आवश्यक असल्याने त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बँक ऑफ बडोदामध्ये खाते उघडले होते. गांधीनगर रेल्वे स्थानकाचे रुपडे बदलण्यासाठी रेल्वे स्थानकाच्या आजूबाजूला असणाऱ्या 521 झोपड्या हटवण्यात आल्या होत्या. त्यानंतर येथे फाईव्ह स्टार हॉटेल उभारण्यात आले. यादरम्यान महेंद्रभाई पाटनी यांचीही झोपडी हटवण्यात आली होती

हे ही वाचा

लोकशाही न्युज वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

नवगण डोअर बीड  वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन

नवगण न्युज  वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या