मामा-भाच्याचा पाठलाग करून धारदार शस्त्राने निघृणपणे केलेल्या हल्ल्यात भाच्याचा मृत्यू

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


दुचाकीवरून आलेल्या टोळीने मामा-भाच्याचा पाठलाग करून धारदार शस्त्राने निघृणपणे केलेल्या हल्ल्यात भाच्याचा मृत्यू झाल्याचा प्रकार रविवारी रात्री टाकळा रोड परिसरात घडला. याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांत सातजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शंतनू ऊर्फ कुमार शाहूराज गायकवाड (वय 21, रा. शिवाजीराव चव्हाण अभ्यासिकेजवळ, राजेंद्रनगर) असे मृत तरुणाचे नाव आहे. अमर सतीश माने (रा. राजेंद्रनगर), रवि कांबळे (रा. कनाननगर) आणि त्यांच्या चार ते पाच साथीदारांवर (नाव-पत्ता माहीत नाही) खुनासह विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यांतील रवि कांबळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मामा श्रीमंत वसंत गवळी (वय 42) यांनी फिर्याद दिली आहे.

श्रीमंत गवळी व त्यांचा भाचा शंतनू हे दोघे रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास कावळा नाक्यावरून राजेंद्रनगरकडे दुचाकीवरून निघाले होते. यावेळी अनुकामिनी मंदिर-टाकळा परिसरात पाठलाग करीत आलेल्या अमर माने व रवि कांबळेसह त्याच्या चार ते पाच साथीदारांनी त्यांना अडविले. ‘तू आणि तुझा मामा बोंद्रेनगरच्या प्रॉपर्टीत लक्ष घालू नका. तुमची दादागिरी आता बास करा. आता मी या भागातला डॉन आहे. तुम्ही या प्रॉपटीत लक्ष घातला तर तुला आणि तुझ्या कुटुंबाला जिवंत ठेवणार नाही,’ अशी धमकी देत दोघांना मारहाण केली. तर, शंतनूच्या डोके-चेहऱयासह शरीरावर तलवारीने व येडक्याने वार केले. गंभीर जखमी झालेल्या कुमारचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाल्याने परिसरातील वातावरण तणावपूर्ण बनले होते.

 

हे ही वाचा

लोकशाही न्युज वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

नवगण डोअर बीड  वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन

नवगण न्युज  वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या