ताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचेसंपादकीय

उद्या जगाला अन्नधान्याची भीषण टंचाई भासेल – पंतप्रधान नरेंद्र मोदी


रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक तणाव निर्माण झाला आहे.
इंडोनेशियातील बाली येथे आजपासूनG20 शिखर परिषदेला(G-20 Summit) सुरू झाली आहे. G-20 शिखर संमेलनाच्या मंचावरूनभारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM-Narendra-Modi) यांनी या युद्धादरम्यान दोन देशांमध्ये विभागलेल्या जगाला मोठा इशारा दिला. जागतिक व्यासपीठावर पहिल्यांदाच जमलेल्या रशिया आणि युक्रेनच्या प्रतिनिधींसमोर पंतप्रधान मोदी म्हणाले की, युक्रेनला युद्धाबाबत मी वारंवार सांगत आलो आहे, युद्धविराम घेऊन शांततेच्या मार्गावर परतण्याचा मार्ग शोधावा लागेल. मोदी म्हणाले की, या युद्धामुळे जगात ऊर्जा, खत आणि अन्नधान्याचे संकट निर्माण झाले आहे. आज खत उपलब्ध झाले नाही, तर उद्या जगाला अन्नधान्याची भीषण टंचाई भासेल, असा इशारा त्यांनी दिला.कोरोनानंतर नवी जागतिक व्यवस्था निर्माण करण्याची जबाबदारी
पीएम मोदी म्हणाले, ‘दुसऱ्या महायुद्धाने जगात हाहाकार माजवला होता. यानंतर त्यावेळच्या नेत्यांनी शांततेच्या मार्गाने पुढे जाण्याचा प्रयत्न केला. आता आपली पाळी आहे. कोरोना नंतर नवी जागतिक व्यवस्था निर्माण करण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे. शांतता, सुरक्षा आणि बंधुता सुनिश्चित करण्यासाठी एकत्रित आणि सामूहिक प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे. भगवान बुद्ध आणि गांधीजींच्या पवित्र भूमीवर जी-20 ची बैठक होईल तेव्हा आपण जगाला शांततेचा ठोस संदेश देऊ, अशी मला खात्री आहे.

PM मोदींनी ज्यो बायडेन आणि इमॅन्युएल मॅक्रॉन यांची घेतली भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी-20 शिखर परिषदेत अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन आणि फ्रान्सचे नेते इमॅन्युएल मॅक्रॉन यांचीही भेट घेतली. शिखर परिषदेचे उद्घाटन करताना, इंडोनेशियाचे अध्यक्ष जोको विडोडो यांनी जागतिक नेत्यांना UN चार्टरचे पालन करण्यास सांगितले आणि रशिया-युक्रेन संघर्षाच्या संदर्भात “युद्ध” संपविण्याचे आवाहन केले.

हे ही वाचा

लोकशाही न्युज वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

नवगण डोअर बीड  वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन

नवगण न्युज  वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या 

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button