इंडिगो कंपनीच्या विमानात अचानक बॉम्ब असल्याची बातमी,विमानाची झडती

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


पाटणा : पाटणा येथून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पाटण्याच्या विमानतळावर दिल्लीच्या दिशेला उड्डाण घेणाऱ्या इंडिगो कंपनीच्या विमानात अचानक बॉम्ब असल्याची बातमी पसरली.

त्यानंतर विमानातील प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. विमानात असलेल्या प्रवाशांपैकीच एकजण आपण सोबत बॉम्ब घेऊन आल्याचं विधान केल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित बातमी वाऱ्यासारखी विमानतळाच्या प्रशासकीय अधिकऱ्यांपर्यंत पोहोचली. तातडीने सूत्रे हलली आणि सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण विमान खाली करण्यात आलं.

घटनास्थळी बॉम्ब शोधक आणि नाशक पथक दाखल झालं आहे. या पथकाकडून बॉम्ब शोधण्याचं काम युद्ध पातळीवर सुरु आहे. पण या पथकाला अद्याप संशयास्पद असं काहीही सापडलेलं नाही. पाटणाहून दिल्लीच्या दिशेला जाणाऱ्या इंडिगो 2126 च्या फ्लाईटमध्ये बॉम्ब असल्याची सूचना मिळाल्यानंतर तातडीने प्लेन खाली करण्यात आलं.

घटनास्थळी बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाला बोलावण्यात आलं आहे. पथक घटनास्थळी दाखल झालं असून तपास सुरु आहे. पण अजूनपर्यंत कोणतीही संशयित वस्तू सापडल्याची माहिची मिळालेली नाही.