ताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचे

पुढील चार दिवस पुन्हा मुसळधार पाऊस


मागील आठवड्यात पावसाने (Rain) जवळजवळ महाराष्ट्रातील (Maharashtra) सर्व जिल्ह्यांना झोडपून काढले. मुंबई शहराची दोन दिवस तुंबई झाली होती. तसेच मुंबई, पुणे आणि ठाणे यांसारख्या विविध महानगरांना पाणीपुरवठा करणारी धरणे देखील तुडूंब भरली आहेत.
राज्यात मुंबई, कोकण, नाशिक आणि मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यातील जालना, बीड हिंगोली, नांदेड जिल्ह्यांत रविवार आणि सोमवार दोन दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.



आठवडाभर झालेल्या तुफान पावसानंतर गेले दोन दिवस पाऊस थोडा थंडावला असून काही ठिकाणी हलका आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरु आहे. आता पुन्हा एकदा पाऊस जोरदार हजेरी लावणार असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे लांबचा प्रवास टाळावा तसेच खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button