क्राईम

नवऱ्याला मध्यरात्रीच संपवलं; बायकोनं बनाव रचला, पनी बिंग कस फुटलं ?


नशेत पती नेहमी घालायचा वाद. अखेर कंटाळलेल्या बायकोने नवऱ्याची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर तिने नवऱ्याच्या आत्महत्येचा बनाव रचल्याचं समोर आलं आहे.पोलीस तपासात मात्र बिंग फुटलं अन् पोलिसांनी आरोपी पत्नीला बेड्या (Wardha Crime News) ठोकल्या. तसंच याप्रकरणी संशयितांनाही ताब्यात घेतलं आहे. नागठाणा येते ही खळबळजनक घटना घडली आहे.

दारूच्या नशेत नवरा नेहमी वाद घालत बायको आणि मुलाला मारहाण करायचा. अखेर संतापलेल्या पत्नीने पतीची गळा आवळून हत्या केली. सुरवातीला पोलिसांची दिशाभूल करत नवऱ्याने आत्महत्या केल्याचा बनाव बायकोने केला. मात्र, पोलीस तपासात हे बिंग फुटले आहे.दारूच्या नशेत होत असलेल्या घरगुती कलहातून झालेल्या वादात नवऱ्याची गळा आवळून हत्या करण्यात आली.

याप्रकरणी सावंगी पोलिसांनी शवविच्छेदन अहवालावरुन हत्येचा गुन्हा दाखल करीत आरोपी पत्नीस अटक करुन इतर तीन ते चार संशयितांना ताब्यात घेतलं आहे. गणेश हरिभाऊ भलावी (४० रा. नागठाणा) असं मृतकाचे नाव आहे. तर पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये मृतकाची पत्नी सुनीता गणेश भलावी हिचा समावेश असल्याची माहिती सावंगी पोलिसांनी दिली आहे.

गणेश भलावी हा मजुरी काम करायचा. दररोजप्रमाणे तो ७ मे रोजीही घरुन सकाळी मजुरी कामासाठी निघाला (Wife Killed Husband) होता. रात्री उशिरा घरी आला. त्याने पोटभर जेवणही केलं. मात्र, नेहमी दारूच्या नशेत वाद घालणाऱ्या गणेशने मध्यरात्री पत्नी सुनिताशी वाद घातला. वादाचं रुपांतर मारहाणीत झालं. अखेर नेहमीच्या त्रासाला कंटाळलेल्या सुनिताने रागाच्या भारात गणेशचा हाताने गळा आवळून हत्या केली. घटनेची माहिती मिळताच सावंगी पोलिसांनी नागठाणा परिसर गाठून पंचनामा केला. घटनास्थळी ठसे तज्ज्ञ आणि श्वानपथक पाचारण करण्यात आलं होतं. याप्रकरणी ८ रोजी रात्री हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आरोपी पत्नी सुनिताने पती गणेशची हत्या केल्यानंतर त्याने गळफास घेतल्याचा बनाव केला. त्याच्या गळ्यात ओढणी बांधून ठेवत पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न (Nagthana) केला. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता त्यांना काही बाबी संशयास्पद वाटल्या. अखेर पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या आरोपी पत्नीनेच हत्या केल्याचं निष्पन्न झाल्यामुळे तिला बेड्या ठोकल्या.

घटनेवेळी घरात केवळ पती अन् पत्नीच हजर असल्याने पोलिसांचा संशय बळावला होता. सुरूवातीला पत्नीच्या जबाबावरून आकास्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात उत्तरिय तपासणीसाठी पाठवला. बुधवारी मृतदेहाचा तात्पुरता शवविच्छेदन अहवाल वैद्यकीय अधिकाऱ्यांनी देताच गणेशची गळा आवळून हत्या (killed) केल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांची दिशा स्पष्ट झाली. त्यांनी तात्काळ आरोपी पत्नीस ताब्यात घेत बेड्या ठोकल्या.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button