ताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

वाहनाची चावी किंवा हवा काढण्याचा अधिकार ट्रॅफिक कॉन्स्टेबलना नाही ! या गोष्टी लक्षात ठेवा !


गाडी चालवताना आपल्या हातून नकळत चुका होतात. गाडी चालवताना सीट बेल्ट लावायला विसरलो. दुचाकी चालवताना हेल्मेट घालायला विसरलो, वाहनाचा लाईट किंवा हॉर्न नीट वाजत नसेल तर तोही ड्रायव्हिंगचा दोष मानला जातो.



दरम्यान, जर ट्रॅफिक कॉन्स्टेबल तुमच्या गाडीची चावी काढत असतील तर तेही नियमाविरुद्ध आहे. तुम्हाला अटक करण्याचा किंवा वाहन जप्त करण्याचा अधिकारही कॉन्स्टेबलना नाही. मात्र, अनेकांना याची माहिती नसते. अनेकदा चूक झाल्यास वाहतूक पोलिसांना पाहून वाहन चालकांना भीती वाटते. अशा वेळी तुम्हाला तुमच्या अधिकारांचीही माहिती हवी.

भारतीय मोटार वाहन कायदा १९३२ नुसार, केवळ ASI स्तरावरील अधिकारीच ट्रॅफिक उल्लंघनावर तुमच्याकडून दंड आकारू शकतात. एएसआय, एसआय, इन्स्पेक्टर यांना दंड आकारण्याचा अधिकार आहे. त्यांना मदत करण्यासाठी वाहतूक हवालदारच असतात. कुणाच्याही गाडीच्या चाव्या काढून घेण्याचा अधिकार त्यांना नाही. एवढेच नाही तर ते तुमच्या कारच्या, बाईकच्या टायरमधील हवाही काढू शकत नाहीत. ते तुमच्याशी चुकीच्या पद्धतीनं बोलू शकत नाहीत किंवा गैरवर्तनही करू शकत नाहीत. जर वाहतूक पोलीस तुम्हाला विनाकारण त्रास देत असतील तर तुम्ही त्याच्याविरुद्ध तक्रारही करू शकता.

यावर गोष्टी लक्षात ठेवा

तुमच्याकडून दंड आकारण्यासाटी वाहतूक पोलिसांकडे चलान बुक किंवा ई-चलान मशीन असणे आवश्यक आहे. जर त्यांच्याकडे या दोन्हीपैकी काहीही नसेल, तर तुमचं चलान कापलं जाऊ शकत नाही.

वाहतूक पोलिसांनीही गणवेशात राहणे गरजेचे आहे. गणवेशावर बकल नंबर आणि त्याचं नाव असावं. गणवेश नसल्यास, पोलीस कर्मचाऱ्याकडे त्यांचं ओळखपत्र विचारता येऊ शकतं.

वाहतूक पोलिसांचे हेड कॉन्स्टेबल तुम्हाला फक्त १०० रुपये दंड करू शकतात. यापेक्षा जास्त दंड फक्त वाहतूक अधिकारी म्हणजे ASI किंवा SI करू शकतात. म्हणजेच, ते तुमच्याकडून १०० रुपयांपेक्षा जास्त दंड आकारू शकतात.

ट्रॅफिक कॉन्स्टेबलनं तुमच्या गाडीची चावी काढली तर त्या घटनेचा व्हिडिओ बनवा. हा व्हिडीओ वरिष्ठ अधिकाऱ्याला दाखवून तुम्ही त्या भागातील पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार करू शकता.

वाहन चालवताना तुमच्यासोबत ड्रायव्हिंग लायसन्स, प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची मूळ प्रत तुमच्यासोबत असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर वाहनाची नोंदणी आणि विम्याची झेरॉक्सही चालू शकते.

जर तुमच्याकडे त्या क्षणी पैसे नसतील तर नंतर अशा स्थितीत तुम्ही नंतर पैसे भरू शकता. अशा स्थितीत कोर्ट चलान जारी करतं , ते कोर्टात भरावं लागतं. या दरम्यान, ट्रॅफिक पोलीस अधिकारी तुमचा लायसन्स त्यांच्याकडे ठेवू शकतात.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button